Aged Tribal agricultural laborers work as blacksmiths to survive Nashik News esakal
नाशिक

उतार वयात पती-पत्नीची जगण्यासाठी कसरत

आनंद बोरा

नाशिक : हात-पाय आहेत पण काम नाही. जगायसाठी उतरत्या वयातही करावी लागतेय कसरत...हे शब्द आहेत करंजपाडा (ता. पेठ) गावाच्या वेशीवर राहणाऱ्या वृद्ध आदिवासी शेतमजूर भिका महादू राबडे यांचे...ते आपल्या पत्नीसमवेत पडक्या घरात राहतात. शेती नाही आणि बाबांची दृष्टी कमी झाल्याने त्यांची पत्नी मजुरी काम करून दोन पैसे मिळवते.

बाबांची कैफियत...

पावसाळ्यात घराची एक बाजू पडली. घर धोकादायक बनले. त्याबद्दलचे गाऱ्हाणे तलाठी, ग्रामसेवकांना सांगूनही कुणीही लक्ष देत नाही ही बाबांची खंत. बाबा उतरत्या वयात पोटाची खळगी भरण्यासाठी लोहारकाम (Blacksmith) करताहेत. करू लागले आहे. विळा, खुरपे बनवत असून शेती साहित्यांना धार लावून देत आहेत. वयोमानामुळे बाजारात जाता येत नसल्याने लोक घरी येऊन वस्तू घेतात. बाबांची कलावंत म्हणून ओळख आहे. तारुण्यात तमाशामध्ये काम करायचे. गावातील तमाशा पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. गावातील कलाकार होते. बाबा सुदामाची भूमिका करायचे. आता तमाशा बंद झाला. कलावंताना सरकार मानधन देते म्हटल्यावर सरकारी कार्यालयांचे उंबरे बाबांनी झिजविले. त्यासाठी सुद्धा बाबांना कुणी दाद दिलेली नाही. त्यामुळे आता आम्ही काय करावे? कसे जगावे? हा प्रश्न पडला असल्याचे भिका बाबा सांगतात.

रेशनमुळे दोन घास

वयाची पासष्टी पार केलेले दांपत्य रोजीरोटीसाठी कसरत आहे. सरकारी रेशनचे धान्य मिळत असल्याने दोन घास पोटात जातात. ग्रामस्थांकडून काहीशी मदत होते. पण बाबांची एक खंत आहे, ती म्हणजे, आदिवासी बांधवांसाठी सरकारच्या योजना असताना त्या अशा गरजू कुटुंबापर्यंत पोचत नाहीत, असे धगधगते वास्तव पुढे आले आहे.

"मला कमी दिसते. आमचे वय झाले आहे. त्यामुळे कामाला जाता येत नाही. मुले नसल्याने उतरत्या वयात खूप त्रास सहन करावा लागतो. लोखंडी साहित्य बनवताना चटके बसतात. आम्हाला दोन वेळचे जेवण आणि घर मिळावे ही अपेक्षा आहे."

- भिका राबडे, वृद्ध शेतमजूर-कलावंत

"भिकाबाबा अनेक वर्षापासून गावात राहतात. गावातील तमाशामध्ये ते काम करायचे. आता म्हातारपणात ते लोहारकाम करतात. त्यांचे घर पावसाळ्यात पडले आहे. सरकारी कार्यालयात अर्ज करून त्यांना अजून मदत मिळालेली नाही."

- यादव मालगवे, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT