agitation by angry farmers immersing district bank seizure notices in Godavari river on Ramtirtha nashik news esakal
नाशिक

Nashik News : जिल्हा बॅंकेच्या नोटीसा बुडवल्या रामतीर्थात; शेतकरी वारकरी समितीचे अनोखे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कांद्याचे दर (Onion Rate) कोसळलेले असताना जिल्ह्याला अवकाळीने झोडपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

अशाही परिस्थितीत जिल्हा बॅंकेकडून सुरू असलेल्या सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. (agitation by angry farmers immersing district bank seizure notices in Godavari river on Ramtirtha nashik news)

वसुली नोटीस प्राप्त झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी गुरूवारी शेतकरी- वारकरी समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या जप्तीच्या नोटिसा रामतीर्थावरील गोदावरी पात्रात बुडवत अनोखे आंदोलन केले. सरकारकडून शेतकऱ्यांचे हाल सुरू असल्याचा आरोप या वेळी समितीने केला.

जिल्हा बॅंकेने थकबाकी वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. यात वर्षोनुवर्षे थकबाकीदार असलेल्यांच्या जमिनींवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. या जप्तीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानावर आंदोलन करण्यात आले होते.

त्यावेळी पालकमंत्री भुसे यांनी जमिनीचे लिलाव होणार नसल्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतरही कारवाई करणारे जिल्हा बॅंकेचे प्रशासक अरूण कदम यांची तडकाफडकी बदली करत त्यांना दणका देण्यात आला. तर, त्यांच्या जागेवर नव्याने रूजू झालेले प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी बँकेला सावरण्यासाठी वसुलीवर भर देणार असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

त्यानुसार बॅंकेने जप्तीची प्रक्रीया पुन्हा सुरू केली आहे. शेतकऱ्यांना तशा नोटीस देण्यात आल्या आहेत. नोटीस प्राप्त झाल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी गुरूवारी (ता. ९) हे अनोखे आंदोलन करून निषेध नोंदविला. संत तुकाराम महाराजांनी बळीराजाला कर्जाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्ज वह्या इंद्रायणी नदीत बुडविल्या होत्या.

त्याच धर्तीवर शेतकरी या नोटीसा बुडवित असल्याचे या वेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले. भगवान बोराडे, किरण गव्हाणे, खंडेराव पाटील, नारायण वाघ, संपतराव धोंगडे, दत्तात्रय संधान, अनंत पाटील सादळे, नारायण मोरे, नारायण गायकर, मोहन काठे, नारायण वाघ आदींनी या आंदोलनात भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT