Agitator R. in front of the Maharashtra Life Authority office in Tilaknagar area. D. Nikam, Shekhar Pagar is P. R. While discussing with Dhokane esakal
नाशिक

Nashik Agitation: गुगळवाड ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन! इंद्रतारा Oil Millच्या वीजजोडणीमुळे पाणीपुरवठा विस्कळित

सकाळ वृत्तसेवा

Nashik Agitation : माळमाथ्यावरील दहिवाळसह २६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या एक्स्प्रेस लाइनवरून इंद्रतारा ऑइल मिलने घेतलेल्या वीज जोडणीमुळे २६ गावांचा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने यावेळी गुगळवाड ग्रामपंचायत पदाधिकरी, ग्रामस्थ आणि लोकशाही धडक मोर्चा पदाधिकारी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. (agitation of Gugalwad villagers Water supply disrupted due to power connection of Indratara Oil Mill nashik news)

मालेगाव तालुक्यातील दहिवाळसह २६ गावांना सात दिवसाआड नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने जीवन प्राधिकरणच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा गुगळवाड ग्रामपंचायत सदस्य आर. डी. निकम व लोकशाही धडक मोर्चाचे शेखर पगार यांनी दिला होता.

सोमवारी (ता.२६) कुलूप ठोको आंदोलनासाठी निवडक कार्यकर्ते व ग्रामस्थ जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर जमा होत त्यांनी याठिकाणी काही वेळ ठिय्या मांडला.

यावेळी कार्यालयासमोर छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक पी. आर. ढोकणे यांनी आंदोलनकर्ते व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सचिन पगार, शाखा अभियंता किरण दाभाडे, अनिल पगार आदींची बैठक घेतली.

जीवन प्राधिकरणाने इंद्रतारा ऑइल मिलची बेकायदा वीज खंडित करावी. योजनेसाठी असलेल्या स्वतंत्र फिडरवरून वीजजोडणी देणाऱ्या संशयितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली.

यावेळी प्राधिकरणाच्या स्वतंत्र वीज वाहिनीवरून इंद्रतारा मिलसाठी वीजजोडणी देण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी कमी दाबाने वीजपुरवठा होतो. त्यामुळे वीजपंप चालू शकत नाही. एक वीजपंप सुरु असताना सुरळीत पाणीपुरवठा शक्य नसल्याचे बैठकीत सांगितले.

त्यानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे वीजजोडणी खंडित करण्यात यावी, तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र पोलिसांना दिले. प्राधिकरणने छावणी पोलिसांना हे पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याचवेळी येत्या आठवड्यात महसूल, जीवन प्राधिकरण, गटविकास अधिकारी, आंदोलनकर्ते व पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी व प्रशासनाने आता आपला मोर्चा इंद्रतारा मिलकडे वळविला आहे.

त्यानंतर आंदोलनकर्ते यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या श्री.निकम व श्री. पगार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली.

आंदोलनात निखिल पवार, संतोष गोसावी, विकास गोसावी, शुभम भदाणे, प्रताप पवार, रमेश पाटील, राजेंद्र पवार, समाधान कदम, संदीप धायतोंडे, विश्‍वास निकम, विजय निकम, शरद बर्वे, दत्तु धायतोंडे, ज्ञानेश्‍वर निकम, अशोक निकम, संकेत निकम आदी सहभागी झाले होते.

"जलजीवनच्या अधिकाऱ्यांनी इंद्रताराची वीजजोडणी खंडीत करण्यासाठी छावणी पोलिसांना तक्रार अर्ज दिला. त्याचवेळी ७ दिवसात पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिल्याने तूर्त आंदोलन मागे घेतले आहे. आता इंद्रताराने वीज जोडणी घेतलीस कशी? त्यांना कोणाचा वरदहस्त आहे? एक्सप्रेस लाईनवर त्यांना वीज जोडणी देऊन २६ गावातील हजारो लोकांना वंचित ठेवणाऱ्यांची चौकशी करावी यासाठी आपण लढा देवू. बेकायदा वीज जोडणी खंडित करून पाणीपुरवठा सुरळीत झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही."

- आर. डी. निकम, आंदोलनकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT