Circular for Transfer of Western Divisional Office in Mumbai  esakal
नाशिक

Sakal Exclusive : ‘AICTE’ चे कार्यालय दिल्‍लीत पळविले

अरुण मलाणी

नाशिक : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांचे मुंबईतील पश्‍चिम विभागीय कार्यालय स्‍थलांतरणाबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

हे कार्यालय दिल्‍ली येथे स्‍थलांतरित करत असल्‍याचे सूचनापत्र ‘सकाळ’ च्‍या हाती लागले आहे. (AICTE has issued circular regarding relocation of its Western Divisional Office in Mumbai to delhi nashik news)

विभागीय कार्यालय पळविल्‍याने शैक्षणिक संस्‍था, विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली असून, स्‍थलांतरणामागे नेमका काय गौडबंगाल आहे, याची चौकशी करताना, तत्‍पूर्वी स्‍थलांतरणाचा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

यापूर्वी विविध शासकीय विभाग, संस्‍थांच्‍या कार्यालयाची पळवापळवी चर्चेचा मुद्दा ठरली असून, यावरुन राजकारण पेटलेले आहे, असे असताना नुकताच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने जारी केलेले परिपत्रक वादाच्‍या भोवऱ्यात सापडले आहे. ‘एआयसीटीई’ तर्फे जारी केलेल्‍या सूचनापत्रकानुसार, पश्‍चिम विभागीय कार्यालय मुंबईहून नवी दिल्‍ली येथे स्थलांतरित करण्यात येत आहे. यासंदर्भात ‘एआयसीटीई’ च्‍या वरिष्ठ स्‍तरावर घेण्यात आलेल्‍या निर्णयानुसार स्‍थलांतरण होत आहे.

‘एआयसीटीई’ चे एकूण दहा विभागीय कार्यालये देशभरात कार्यरत आहेत. त्‍यापैकी मुंबईतील चर्चगेट परिसरात असलेले सध्याचे विभागीय कार्यालय नवी दिल्‍ली येथे स्थलांतरित करत असल्‍याचे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. विशेष म्‍हणजे संकेतस्‍थळावर कुठेही हे परिपत्रक अपलोड करण्यात आलेले नसल्‍याचे आढळून आले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

संस्‍था, महाविद्यालयांची गैरसोय

विविध तंत्रशिक्षण शिक्षणक्रम, औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासक्रम ‘एआयसीटीई’ अंतर्गत येत असतात. अशावेळी प्रवेश क्षमतेपासून अन्‍य विविध परवानग्‍यांशी निगडित बाबी या विभागांतर्गत येतात. विभागीय कार्यालय स्‍थलांतरणामुळे शैक्षणिक संस्‍था, महाविद्यालयांची गैरसोय होण्याची शक्‍यता असून, यामुळे नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.

मग स्‍थलांतरणाचे नेमके कारण काय...

देशाची राजधानी दिल्‍ली असली तरी आर्थिक राजधानी म्‍हणून मुंबईची वेगळी ओळख आहे. पायाभूत सुविधांपासून सर्वांगाने मुंबई सुसज्‍ज असतानाही कार्यालय दिल्‍लीत स्‍थलांतरण करण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्‍न शैक्षणिक क्षेत्रातील तज्‍ज्ञांकडून उपस्‍थित केला जातो आहे. एकेवेळी गुजरातला पळविले असते तर नवल वाटले नसते, पण दिल्‍लीत कार्यालय नेण्यामागे काय कारण असेल, असाही विनोदी प्रश्‍न उपस्‍थित केला जात आहे.

"एआयसीटीई चे विभागीय कार्यालय मुंबई या ठिकाणी सोयीचे होते. नवी दिल्‍लीत स्‍थलांतरणामुळे शैक्षणिक संस्‍था, महाविद्यालयांच्‍या प्रतिनिधींना संपर्क साधणे, कामकाजासाठी कार्यालयाला भेट देणे अडचणीचे ठरु शकते. त्‍यामुळे स्‍थलांतरणाच्‍या निर्णयाचा पुनर्विचार होणे आवश्‍यक आहे." - प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, एमजीव्‍ही संस्‍थेचे फार्मसी महाविद्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT