Collector Jalaj Sharma, Sandeep Patil, Dhananjay Bele, Nikhil Panchal, Deputy Commissioner of GST Jagdish Doddy, along with entrepreneurs who participated in the seminar organized on the government's import-export policy.  esakal
नाशिक

Nashik AIMA News : निर्यात क्षेत्रात नाशिकचा टक्का वाढविणार; आयमा’चा निर्धार

सकाळ वृत्तसेवा

Nashik AIMA News : जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राला पोषक असलेल्या वातावरणाचा लाभ उचलून नाशिकमधून निर्यातीचा टक्का वाढविण्यावर भर देणार असल्याचा निर्धार अंबड इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)तर्फे करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि विविध औद्योगिक संघटना आणि बँकर्सतर्फे हॉटेल कोर्टयार्ड येथे आयात-निर्यात धोरणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयमा संघटनेतील उद्योजक आणि पदाधिकारी यांनी हा निर्धार व्यक्त केला. (Aima determ that Nasik percentage will increase in export sector news )

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, बीओटी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, जीएसटीचे उपायुक्त जगदीश डोड्डी, स्टेट बँकेचे उपमहाव्यवस्थापक राजीव सौरभ, बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी.बी.सिंग, पोस्ट कार्यालयाचे उपअधीक्षक प्रफुल्ल वाणी, कांतिलाल चोपडा, संजय सोनवणे, प्रमोद चौगुले, अविनाश मराठे, आशिष नायर, संग्राम साठे, विवेक सोनवणे आदी होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, की आपल्या भाषणात सुरुवातीला औद्योगिक क्षेत्र परिसरात शांतता प्रस्थापित करण्यास तसेच निर्यात वाढीसाठी आयमा आणि निमा या दोन्ही संस्था हातात हात घालून काम करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

महाराष्ट्रात निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. नाशिकमधून निर्यातीचा वेग चांगला आहे. निर्यातीच्या बाबतीत नाशिक राज्यात पहिल्या पाच मध्ये आहे. नाशिक लवकरच पहिल्या तीनमध्ये कसे येईल या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

श्री. पांचाळ म्हणाले आयामांची भूमिका स्पष्ट करत जिल्ह्यातील उद्योजकांना निर्यात वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. निर्यात वाढीसाठी शासनातर्फे नवीन धोरणासाठी मसुदा तयार करण्यात येत असून त्यात आयमाची मोलाची भूमिका राहणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यासाठीच्या अडीअडचणींचे निरसन करण्यास आयमातर्फे इम्पेक्स पॉलिक्लिनिक सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्याची निर्यात दुप्पट करण्याचा मानस असून यासाठी उद्योजकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

उद्योजकांनी त्यांच्या सूचना व मागण्या लेखी स्वरूपात आयमाकडे पाठवाव्यात.त्याचा समावेश राज्याच्या निर्यात विषयक धोरणाच्या मसुद्यात करण्यास आपण शासनाला भाग पाडू, असेही पांचाळ यांनी नमूद केले

कृषी क्षेत्रात नाशिक जिल्हा देशात अव्वल दहा मध्ये कसा येईल यादृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे.आवश्यकता वाटल्यास त्यासाठी कृषी सल्लागारांचाही सल्ला घ्यावा असे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सुचविले.

आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, सचिव गोविंद झा, रवींद्र झोपे, राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत,जे.आर. वाघ, के.एस.सिंग, देवेंद्र विभुते, जयंत जोगळेकर, जयंत पगार, योगेश दुसाने, तुषार थोरात, नवीन पांडे, आदित्य वाशीकर, मनीष रावल, कृष्णा बोडके, दिलीप वाघ, कृत्तिका महाजन, कर्णसिंग पाटील, सागर देवरे, कैलास पाटील, सचिन शाह, हृषीकेश वाकडकर, धीरज वडनेरे, वीणा माजगावकर, विवेक पाटील, समीर पाटील, सुमीत आदींसह उद्योजक उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रिया पांचाळ यांनी आपल्या खास शैलीत केले तर आभार आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी मानले.

नाशिकमधून २३ हजार कोटींची निर्यात : पाटील

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी निर्यात करताना येणाऱ्या अडीअडचणी आणि निर्यात बाबतची नाशिकची स्थिती सांगितली. २०२२-२३ या वर्षात २३ हजार कोटींची निर्यात करून नाशिकने या क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. भविष्यात त्यात आणखी १५.५ टक्के वाढ अपेक्षित असून त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

यावेळी त्यांनी उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलती आणि निर्यात वाढीसाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सुरू असलेल्या योजनांची माहितीही त्यांनी विशद करत महाराष्ट्र सरकारचे आयात-निर्यात विषयक धोरण ऑक्टोबरमध्ये जाहीर होणार आहे. त्याचा मसुदा तयार करताना उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा तसेच सूचनांचा यात अंतर्भाव करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT