Air Pollution esakal
नाशिक

Nashik Air Pollution: वायुप्रदूषणात नाशिक शहराची आघाडी; कारवाईचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Nashik Air Pollution : मुंबई, पुणे पाठापोठ नाशिकमध्ये वायुप्रदूषणात वाढ होत असल्याची गंभीर बाब महापालिकेकडून नोंदविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नगररचना विभागाने वायुप्रदुषण कमी करण्यासाठी बांधकामांसाठी नियमावली जारी केली आहे. नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन बांधकाम व्यावसायिकांना करण्यात आले असून, पंधरा दिवसात अंमलबजावणी न झाल्यास कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवाळीपूर्वी देशातील दिल्ली व राज्यात मुंबई व पुणे शहरात वायुप्रदूषणाने पातळी गाठल्याचे समोर आले होते. त्याअनुषंगाने राज्य शासनाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रदूषणाची पातळी खालावली.

नाशिकमध्ये प्रदूषण स्थिर असले तरी महापालिकेने गंभीर बाब नोंदविली. राज्यात नाशिक वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये आघाडीवर आहे. (Air pollution is increasing in Nashik news)

बांधकामांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने बांधकामांच्या साइटवर होणारे वायुप्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांसह नरेडको, क्रेडाई, बिल्डर्स असोसिएशन या संघटनांनादेखील त्यांच्या पातळीवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वायुप्रदुषण धोकादायक असल्याचे निरीक्षण नोंदविता उपाययोजनादेखील सुचविण्यात आल्या आहेत.

"शहरात बांधकामे वेगाने वाढत असल्याने त्याअनुषंगाने वायुप्रदूषणदेखील होत आहे. त्यासाठी शासनाने जारी केलेली नियमावलीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे." - हर्षल बाविस्कर, उपसंचालक, नगररचना विभाग, महापालिका.

वायुप्रदूषण कमी करण्यासाठी नियमावली

- ५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवती किमान २५ फूट उंच पत्रे लावावे.

- बांधकाम साइटवर चारही बाजू ओल्या हिरव्या कापडाने बंदिस्त करावे.

- पाडण्यात येणारी सर्व बांधकामे वरपासून खालपर्यंत ताडपत्री/ओल्या हिरव्या कापडाने/ओल्या पाटाने झाकावी.

- इमारतीचे पाडकाम करताना पाणी फवारावे.

- बांधकामाच्या ठिकाणी अॅन्टी-स्मॉग गनचा वापर करावा.

- बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकावी.

- वाहनातून गळती टाळण्यासाठी वाहने ओव्हरलोड करू नये.

- बांधकाम साईट्सवर सेन्सर-आधारित वायुप्रदूषण मॉनिटर्स लावावे.

- ग्राइंडिंग, कटिंग, ड्रिलिंग, सॉइंग, ट्रिमिंगची कामे बंदिस्त भागात करावी.

- बांधकाम कचरा व्यवस्थापन काटेकोरपणे करावे.

- पूल आणि उड्डाणपुलाच्या कामावर २० फुटांचे बॅरिकेडिंग. असावे.

- जमिनीवरील मेट्रोची सर्व कामे २० फूट उंचीच्या बॅरिकेडिंगने झाकावी.

- जिल्हाधिकारी व आयुक्तांचे बांधकाम कचरा वहन रोखण्यासाठी विशेष पथके.

- बांधकाम साहित्य, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांना ट्रॅकिंग यंत्रणा.

- बांधकाम साहित्य रस्त्यावर सांडणाऱ्या वाहनांवर कारवाई.

- मुदत पूर्ण होत असलेल्या वाहनांसाठी स्क्रॅप धोरण.

- उघड्यावर कचरा जाळण्यावर पूर्णपणे बंदी.

- महापालिका हद्दीत रस्त्याच्या कडेला पक्के फुटपाथ.

- बेकरी साठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर.

- विद्युतदाहिनी किंवा पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार पद्धती.

- हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र वाढविणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

Disha Patni : दिशा पटनीच्या वडिलांची झाली फसवणूक ; अध्यक्ष बनवण्यासाठी तब्बल 25 लाखांचा गंडा

अख्खं कुटुंबच उद्‌ध्वस्त झाल्याने चांदीनगरी हळहळली; शत्रूच्याही वाट्याला न यावा असा दुर्दैवी प्रसंग, नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT