nashik air service esakal
नाशिक

Nashik Air Service : जूनपासून हैदराबाद, इंदूरसाठी विमानसेवा; अहमदाबादसाठी आता नाशिककरांना 2 विमाने

सकाळ वृत्तसेवा

Nashik Air Service : इंडिगो कंपनीकडून १ जूनपासून नियमितपणे हैदराबाद, इंदूर व अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अहमदाबादसाठी आता नाशिककरांना दोन विमाने उपलब्ध होतील. (Air service to Hyderabad Indore from June Now 2 flights to Nashikkar for Ahmedabad nashik news)

इंडिगो कंपनीकडून विमानसेवेचा विस्तार करताना नाशिकला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार हैदराबाद व इंदूरसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीकडून घेण्यात आला. अहमदाबादसाठी यापूर्वी एक विमान नियमितपणे सुरू आहे.

आता आणखी एक विमान सेवा सुरू केली जाणार आहे. हैदराबादहून सकाळी साडेअकरा वाजता नाशिकसाठी विमानाचे उडान होईल. साडेबारा वाजता नाशिकच्या ओझर विमानतळावर पोचेल.

हैदराबादसाठी नाशिकहून पावणेदोन वाजता उड्डाण होईल व दुपारी साडेचार वाजता हैदराबाद विमानतळावर पोचेल. इंदूरहून नाशिकसाठी १ वाजून पंधरा मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल. २ वाजून २५ मिनिटांनी नाशिकच्या ओझर विमानतळावर विमान पोचेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर ओझर विमानतळावरूनच १२.५० मिनिटांनी इंदूरसाठी विमान उड्डाण होईल. दुपारी दोन वाजता इंदूरला विमान पोचेल. अहमदाबादहून सकाळी आठ वाजता नाशिकसाठी विमानाचे उड्डाण होईल.

९.२५ मिनिटांनी ओझर विमानतळावर विमान पोचेल. नाशिकहून सकाळी ९.४५ वाजता अहमदाबादसाठी उड्डाण होईल व ११.०५ वाजता विमान पोचेल, अशी माहिती इंडिगो कंपनीकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT