Saket Chaturvedi, CEO of HAL (MIG Complex), Managing Director of Airbus India, Remy Maillard, etc., while showing the certificate after signing an agreement between HAL and Airbus regarding MRO. esakal
नाशिक

Nashik News: HALमधून विमानांची देखभाल व दुरुस्ती; ओझर ‘एचएएल’ व एअर बस कंपनीबरोबर करार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : देशात दुसऱ्या क्रमांकाची धावपट्टी, विमाने तयार करण्याचा कारखाना व सर्वांत रहदारीच्या मुंबई विमानतळापासून नजीकचे हवाई अंतर याचा विचार करता नाशिकच्या हिंदुस्थान एरोनेटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीमार्फत प्रवासी व लढाऊ विमानांची देखभाल दुरुस्ती करण्याची विमान कंपन्यांची मागणी गुरुवारी (ता. ९) प्रत्यक्षात उतरली.

दिल्ली येथे एका कार्यक्रमादरम्यान ए-३२० विमानांसाठी देखभाल, दुरुस्ती व ओव्हरहॉल (एमआरओ)साठी ‘एचएएल’ व एअरबस कंपनीत करार करण्यात आला. (Aircraft maintenance and repair from HAL Agreement with Ozer HAL Air Bus Company Nashik News)

मुंबईसह देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर उतरणाऱ्या विमानांना ठराविक उड्डाण केल्यावर देखभाल व दुरुस्तीची आवश्‍यकता असते; परंतु विमानांच्या देखभाल व दुरुस्ती तसेच ओव्हरहॉलची व्यवस्था नसल्याने सिंगापूर व अन्य देशांमध्ये विमाने जातात.

यात वेळ, पैसा व इंधन मोठ्या प्रमाणात खर्च होते. अशा प्रकारची सुविधा भारतात व्हावी व त्यासाठी ‘एचएएल’कडे इन्फ्रास्ट्रक्चर असल्याने पुढाकार घ्यावा, अशी विमान कंपन्यांची मागणी मागील २० वर्षांपासून होती.

त्यातही सर्वाधिक रहदारीच्या मुंबई विमानतळापासून ओझर येथील एचएएल कंपनी व विमानतळ जवळचे असल्याने येथे एमआरओ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होती. ती मागणी गुरुवारी पूर्ण झाली.

एमआरओ सुविधा स्थापन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. एचएएल व एअरबस कंपनीत करार करण्यात आला. नागरी विमान वाहतूक महासंचालकांच्या परवानगीनंतर नोव्हेंबर २०२४ पासून प्रत्यक्षात काम सुरू होईल.

युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीची मान्यता मिळाल्यावर संपूर्ण आशियासाठी नाशिकमधून सुविधा उपलब्ध होणार असल्याचे ‘एचएएल’तर्फे स्पष्ट करण्यात आले. ‘एचएएल’चा भारतात एकात्मिक एमआरओ सेवा स्थापन करण्याचा मानस आहे.

व्यावसायिक विमान कंपन्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा एमआरओच्या माध्यमातून प्रदान करण्याचा प्रयत्न आहे. एअरबस ए ३२० फॅमिली टूल पॅकेजचा पुरवठा करेल. विमानांच्या एमआरओ सुविधा स्थापन करण्यासाठी ‘एचएएल’ला विशेष सल्लागार सेवा देण्यात येईल.

"एअरबस भारतातील विमान वाहतूक परिसंस्था वाढविण्यासाठी वचनबद्ध आहे. मजबूत एमआरओ, पायाभूत सुविधांचा विकास हा या परिसंस्थेचा मुख्य घटक आहे. एकदा स्थापन झालेली सुविधा भारतात एक प्रकारची राहील. एचएएल आणि एअर बसच्या सहकार्याने वेळेत बचत, एमआरओ खर्चात घट होईल. ए-३२० विमान कुटुंबासाठी एमआरओ सुविधा स्थापन केली जाईल."- रेमी मेलर्ड, व्यवस्थापकीय संचालक, एअरबस इंडिया

"‘एचएएल’ व एअर बसमधील भागीदारी देशातील एमआरओ सेवांच्या वाढत्या मागणीला पाठिंबा देईल आणि व्यावसायिक ताफ्याचा विस्तार करेल. ‘एचएएल’ला देशात एकात्मिक एमआरओ हबची स्थापना करायची आहे आणि एअरलाइन्सला प्रभावी एमआरओ उपाय उपलब्ध करून द्यायचे आहे. ‘एचएएल’चे हे पाऊल नागरी-लष्करी अभिसरण आणि सरकारच्या मेक-इन-इंडिया मिशनशी सुसंगत आहे."- साकेत चतुर्वेदी, सीईओ (मिग कॉम्प्लेक्स), ‘एचएएल’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT