Shivsena, Bjp, Ncp Esakal
नाशिक

Nashik Loksabha Election: नाशिक लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा; भाजप-शिंदे सेनेसाठी धोक्याची घंटा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Loksabha Election : लोकसभेत अधिक जागा वाढविण्याबरोबरच महाराष्ट्रात सत्ता आणायची असेल तर सत्तेत वाटा मागणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचा नाशिक लोकसभेवर दावा असून त्याचबरोबर नाशिक शहरातील मुस्लिम, दलित मतदार अधिक असलेल्या मध्य विधानसभेच्या जागेवर दावा असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली.

त्यामुळे दिवाळीनंतर या दोन्ही मतदार संघात राजकीय फटाके फुटण्यास सुरवात होणार असून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेचा शिंदे गट व भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

दिवाळी शुभेच्छांच्या निमित्ताने दिल्लीत अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळी राज्यातील सध्याच्या राजकारणावर चर्चा झाली. चर्चेत राज्यात यश मिळविण्यासाठी सत्ता वाटप योग्य प्रकारे झाले पाहिजे. (Ajit Pawar faction of NCP claims Nashik Lok Sabha seat news)

अशी आग्रही मागणी तिघांकडून करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागणी नंतर राज्यातील राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु झाली असून त्याचा परिणाम नाशिक मध्येही होणार असल्याचे दिसून येत आहे.

नाशिकची जागा न सोडण्याचा शिंदे गटाचा निर्धार

नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार आहेत. त्याचबरोबर अर्धा डझनहून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाणे पाठोपाठ नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचा दावा आहे. विद्यमान खासदारांबद्दल पक्षात व मतदारांमध्ये नाराजी असली तरी अन्य पर्याय शोधला जाईल.

परंतू नाशिक लोकसभेची जागा सोडायची नाही. असा निर्धार शिंदे सेनेकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे नाशिक मध्ये सक्षम उमेदवार मिळाला नाही तरी नाशिकमध्ये एका जागेवरचा दावा सोडायचा नाही. त्यासाठी लोकसभेच्या अडीच मतदार संघापैकी धुळे लोकसभेसाठी देखील शिंदे सेनेचा दावा असून भाजपचा नाशिक लोकसभेसाठी असलेला तीव्र आग्रह लक्षात घेता धुळे लोकसभा शिंदे सेनेकडून मागितला जाण्याचीच दाट शक्यता आहे.

अजित पवार गटाची एन्ट्री

नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटात स्पर्धा तीव्र झाली असताना त्यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाने उडी घेतल्याची माहिती सुत्रांची आहे. नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला देखील हवी आहे.

भाजपकडून लोकसभेचे सूत्र ठरविताना सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी तीन जागा सोडल्या जाणार असल्याचे समजते. जागा वाटपाचे सूत्र राष्ट्रवादीला मान्य नाही. त्यामुळे नाशिकच्या जागेची जोड दिली जात असून त्या जागेवरील दाव्यामुळे शिंदे सेनेबरोबरचं भाजप मध्येही धडकी भरली आहे.

राष्ट्रवादीला हवीय मध्य विधानसभा

लोकसभे बरोबरच विधानसभेसाठी राष्ट्रवादीला नाशिक मध्य मतदारसंघाची जागा हवी आहे. या मतदारसंघा मध्ये दलित व मुस्लिम मते जवळपास ८५ हजारांच्या आसपास आहे. त्याचबरोबर ८० हजारांच्या आसपास मराठा मतदान असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाला मध्य विधानसभेची जागा हवी आहे. त्यादृष्टीने देखील प्रयत्न सुरु झाले असून उमेदवार देखील निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. ‘नामको’ पार पडल्यानंतर उघडपणे इच्छुकांकडून प्रचार सुरु होणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT