Sakal
नाशिक

Nashik Politics News : शिंदे गटात उल्हास, पवार गटात फाल्गुनमास! ट्रिपल इंजिन सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून धुसफुस

सकाळ वृत्तसेवा

Nashik Politics News : राज्यात पालकमंत्री पदात बदल करताना नाशिकची जबाबदारी विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे कायम ठेवण्यात आल्याने महायुती सरकारच्या ट्रिपल इंजिनच्या सरकारमधील शिंदे गटात उल्हास निर्माण झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात छगन भुजबळ यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने नाराजी आहे.

गिरीश महाजन यांना नाशिकपासून दूर ठेवण्यात आल्याने भाजपमधील महाजन गटाच्या नेत्यांना तोंडावर बोट ठेवण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचेच असल्याने पालकमंत्रिपद राष्ट्रवादीलाच मिळाले पाहिजे, असा दावा अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने नाशिकमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Ajit Pawar group of NCP is unhappy due to Chhagan Bhujbal was not given post of Guardian Minister nashik politics news)

राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग झाल्याने ‘ट्रिपल इंजिन’चे सरकार म्हणून संबोधले जाते. मात्र या ‘ट्रिपल इंजिन’च्या सरकारमध्ये अनेक महिन्यांपासून पालकमंत्रिपदाचा वाद आहे. सध्या नाशिकचे पालकमंत्रिपद दादा भुसे यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे यापूर्वी बंदरे व खनिकर्म खाते होते. हे दुय्यम दर्जाचे खाते मानले जात असल्याने त्यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.

मध्यंतरीच्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याची जबाबदारी देण्यात आली. मोठ्या पदाची जबाबदारी आल्याने भुसे यांच्याकडील पालकमंत्री पदाची जबाबदारी काढून अन्य जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाईल, असे बोलले जात होते.

महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालेल्या छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरीपुरवठामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडे पुन्हा नाशिकचे पालकमंत्री पदाची जबाबदारी येईल, अशी चर्चा होते.

त्या अनुषंगाने त्यांनी बैठकांचा धडाका लावला होता. मात्र आज नव्याने झालेल्या पालकमंत्री पदाच्या बदलांमध्ये दादा भुसे यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली. त्यामुळे शिंदे गटात उल्हासाचे वातावरण आहे. मात्र राष्ट्रवादीच्या गटात नाराजीचा सूर आहे.

राष्ट्रवादीकडे पालकमंत्रिपद अपेक्षित

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्री पदाच्या वाटपावरून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार आहेत. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरदेखील आमचेच असल्याने जिल्ह्यात एकूण सात आमदार होतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाच पालकमंत्रिपद मिळणे अपेक्षित होते. तोच दावा भुजबळ यांनी मुंबईत केला.

भाजपमध्ये शांतता

राज्यात भारतीय जनता पक्षाचे सत्ता असूनही दुय्यम वागणूक दिली जात असल्याची खदखद पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आहे. नाशिकमध्ये ही खदखद उसळून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी येईल.

असे अनेक महिन्यांपासून बोलले जात होते. १५ ऑगस्टला महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यामुळे पालकमंत्री पदावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, असा अंदाज लावला जात होता. परंतु पालकमंत्र्यांच्या घोषणेत महाजन यांना नाशिकपासून दूर ठेवण्यात आल्याने भाजपने या विषयावर छुपी साधणे पसंत केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT