नाशिक : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्याला या संकटकाळात सावरण्यासाठी मदत व्हावी म्हणून आम्ही अधिवेशनात हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली अन् सरकारने तीनशे रुपये जाहीर केले.
आम्ही पुन्हा अनुदान वाढवण्याची मागणी केली तर साडे तीनशे रुपये अनुदान देण्यात आले. असे अनुदान देताना सरकार शेतकऱ्याची थट्टा करत आहे असा घणाघात अजित पवार यांनी राज्य सरकार विरोधात केला. नाशिक येथे पत्रकारांशी ते बोलत होते. (Ajit Pawar statement about government giving subsidy in nafed onion purchase nashik political news)
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
अजित पवार म्हणाले, आम्ही सरकारला सांगितले, ज्याप्रकारे तुम्ही अनुदान देत आहात ही थट्टा आहे. आम्ही वेगवेगळे खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. अधिवेशन 25 तारखेला संपले. बरेच ठिकाणी ऐकू येत आहे की, केंद्र बंद आहे.
कांदा खरेदी सुरु झाली पाहीजे. कर्मचाऱ्यांच्या संप काळात काही शेतकऱ्यांना मदत पोहचली नाही. हरभरा केंद्र देखील आणखी सुरू करावे. याविषयी मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधणार आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.