सिन्नर (जि. नाशिक) : शहा येथील १३२ केव्ही सबस्टेशनवरून वडांगळी, सोमठाणे, देवपूर या उपकेंद्रांना वीज पुरवठा करण्यात येत आहे. ही शेतकरी वर्गासाठी हिताची गोष्ट आहेत. आमदार माणिकराव कोकाटे, आमदार आशुतोष काळे माझ्यामागे शहा येथील सब स्टेशन व जलजीवन योजना याचे उद्घाटन करण्यासाठी मागे लागले होते.
जिद्द असेल तर कोणतेही काम शक्य होते असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. शहा येथील १३२ केव्ही सबस्टेशन व जलजीवन कामांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ३०) झाले. (Ajit Pawar statement Inauguration of Substation Jaljeevan Works at Shah nashik news)
सिन्नरच्या पूर्वभागासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला वीज प्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून शहा येथील १३२ केव्हीए क्षमतेचे वीज केंद्र मार्गी लागले आहे.
जानेवारीत हे वीज केंद्र बाबळेश्वर येथून पॉवर ग्रीड च्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आले आहे. सिन्नर तालुक्यातील बस स्टॅन्ड, ग्रामीण रुग्णालय, सिन्नर नगरपालिकेची इमारत आदी प्रशासकीय इमारती अतिशय सुसज्ज आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून झाल्या आहेत. सिन्नर सारख्या प्रशासकीय इमारती बारामतीतही नाही.
या प्रसंगी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार आशुतोष काळे, ज्येष्ठ नेते भगीरथ शिंदे, सीमंतिनी कोकाटे, बाळासाहेब वाघ, रंजन ठाकरे, रवींद्र पवार, विजय गडाख, राजेंद्र घुमरे, शशिकांत गाडे, विठ्ठल उगले, अक्षय उगले आदी उपस्थित होते.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
कोकोटे यांना खासदार करायचेय
अजित पवार म्हणाले, सरकार आले तर आमदार कोकाटे यांची ऊर्जामंत्री होण्याची इच्छा आहे. त्यांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल त्यासाठी अगोदर मतदान प्रक्रिया होणे खूप गरजेचे आहे. आम्हाला कोकाटे यांना खासदार करायचे आहे ते तर आमदार होण्याचे म्हणताय असे म्हणातच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
आमदार कोकाटे यांचा अभ्यास तालुका विषयी खूप आहे. अतिशय अभ्यासू हा व्यक्ती असून सिन्नर मधील नदीजोड प्रकल्प तसेच, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोकाटे यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.