Ajit Pawar Devendra Fadnavis Sakal
नाशिक

NCP Ajit Pawar Update : अजित पवार मुख्यमंत्री होतील असे योग... ज्योतिष वाचस्पतींचे राज्यातील परिस्थितीवर भाकीत

Maharashtra Politics Update : अजितदादा आणि फडणवीस या दोघांना साडेसाती चालू आहे. दोघांच्या कुंडलीत शनी बलवान आहे.

प्रशांत कोतकर

NCP Political Crisis : राज्यातील राजकीय अस्थिरता बघता नाव, राशी, कुंडली काय सांगतात, याचा शोध घेतला असता राज्याच्या सध्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोघांमध्ये नैसर्गिक मैत्री असून, राजकारणात ती दीर्घकाळ दिसेल, असे भाकीत ज्योतिषवाचस्पती डॉ. नरेंद्र धारणे यांनी केले आहे. (Ajit Pawar will become Chief Minister in near future speculation by Jyotish Vachaspathi Dr Narendra Dharne nashik news)

डॉ. धारणे यांनी सांगितले, की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांची रास कुंभ आहे. पण जन्म नक्षत्र वेगळे आहे. तसेच दोघांचा वाढदिवसही जुलैमध्येच येतो. त्यामुळे दोघांमध्ये नैसर्गिक मैत्री आहे.

ती राजकारणात दीर्घकाळ दिसेल. अजितदादा आणि फडणवीस या दोघांना साडेसाती चालू आहे. दोघांच्या कुंडलीत शनी बलवान आहे. त्यामुळे चालू साडेसाती दोघांना राजकीय उच्चपद देईल, असे योग आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अजितदादांना राजयोग

राज्यातील चालू राजकीय घडामोडींत नजीकच्या काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे योग आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रास धनू असून, मूळ नक्षत्र, शुक्र, गुरू युती राजयोगमुळे ते उच्चपदी विराजमान आहेत. तो राजयोग गोचर ग्रहस्थितीनुसार सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे ते त्या पदावर राहतीलच, असे कुंडलीवरून वाटत नसल्याचे स्पष्ट मत डॉ. धारणे यांनी व्यक्त केले.

विरोधी पक्षाच्या भूमिकेतच राहावे लागणार

खासदार सुप्रिया सुळे यांची रास धनू, तर उद्धव ठाकरे यांची सिंह रास असून, राज ठाकरे यांची तुला रास आहे. या तिघांच्या कुंडलीत सध्या तरी सत्ता मिळण्याचे राजयोग नाहीत. त्यामुळे पुढील सात वर्षे त्यांना विरोधी पक्षाच्या भूमिकेतच राहावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आगामी सहा महिन्यांत आरोग्य समस्येमुळे राजकीय निवृत्ती घेतील, असेही भाकीतही डॉ. धारणे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT