Shetkari Sahitya Sammelan esakal
नाशिक

Shetkari Sahitya Sammelan : नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन; नाना पाटेकर उद्‍घाटक

सकाळ वृत्तसेवा

Shetkari Sahitya Sammelan : लेखणीतून शेतीची दुरवस्था थांबवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली, सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण व्हावी, या उद्देशाने येत्य ४ व ५ मार्चला नाशिकमध्ये ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन होत आहे.(Akhil bhartiya marathi Shetkari Sahitya Sammelan in nashik news)

अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी ही माहिती दिली. शेतीला भेडसावणाऱ्या दाह वास्तवाची जाणीव मराठी साहित्य विश्‍वाला होण्याच्या उद्देशाने हे संमेलन होत आहे. दहा वर्षांपासून या उपक्रमात सातत्य राखण्यात आले असून, यंदाचे संमेलन ११ वे असेल.

शेती उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करून शेतीउद्योगाला नवी दिशा देणाऱ्या मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्म्स परिसरात हे संमेलन भरत आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक भानू काळे संमेलनाचे अध्यक्ष असतील. नाम फाउंडेशनचे संस्थापक तथा चित्रपट अभिनेते नाना पाटेकर संमेलनाचे उद्‍घाटन करतील. ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप प्रमुख पाहुणे असतील.

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे स्वागताध्यक्ष असून, गंगाधर मुटे कार्याध्यक्ष आहेत. तसेच संयोजक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश बोरुळकर यांची निवड करण्यात आली. संमेलनसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्यात प्रमोद राजेभोसले, ज्ञानेश उगले, शंकरराव ढिकले, सोपान संधान, निवृत्ती कडलग, प्रा. डॉ. कुशल मुडे, दिलीप भोयर, रवींद्र दळवी, सारंग दरणे, गणेश मुटे यांचा समावेश आहे.

संमेलनाचे स्वरूप

कौशल्य गुणांचे, प्रतिभेचे प्रदर्शन मांडून साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबिर ठरावे आणि सशक्त लेखणीतून इंडियाच्यासमवेत भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्याचा उद्देश या संमेलनामागे आहे.

संमेलनाचे उद्‍घाटन सत्र, शेतकरी कविसंमेलन, शेतकरी गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविध कार्यक्रम संमेलनात असतील. संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्र, अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आदी वक्ते सहभागी होतील. शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी अधिक नोंदणी करून उपस्थित राहावे, असे श्री. मुटे यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT