Swami Samarth Gurupeeth : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामागातर्फे गुरुपीठात निवासी याज्ञिकी प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे.
संपूर्ण राज्यभरातून २६० प्रशिक्षणार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जात आहे. (Akhil Bhartiya Shree Swami Samarth Sevamagah started residential Yoga training in Gurupeeth nashik news)
चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे, आबासाहेब मोरे व आप्पासाहेब शिखरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन याज्ञिकी प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. या प्रशिक्षणांतर्गत वर्षभरातील सेवामार्गातर्फे होणारे दोन नामजप यज्ञ सप्ताह कशा पद्धतीने करावेत, मंडल पूजन पद्धती, संकल्प कसा करावा, पंचांगाचे वाचन कसे करावे, त्याचप्रमाणे विविध स्तोत्र, मंत्र कसे म्हणावे, यज्ञातील पूजा पद्धती कशी करावी याची माहिती दिली जात आहे.
सकाळी सहा ते सात या वेळेत नित्य संध्यावंदन होते. त्यानंतर भूपाळी आरती झाल्यावर श्रीमद् गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन कसे करावे, त्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले जाते. दुपारच्या सत्रात संस्कृत संभाषण आणि संवाद यांचे प्रशिक्षण होते. त्यानंतर श्री गणपती अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, पुरुषसूक्त, पवमान सूक्तासह विविध स्तोत्र-मंत्र प्रत्येक प्रशिक्षणार्थी योग्य प्रकारे म्हणतो की नाही, याची काळजीपूर्वक पाहणी करून मार्गदर्शन केले जाते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सायंकाळी साडेसहाच्या आरतीनंतर विष्णुसहस्रनाम आणि संस्कृत श्रीदुर्गा सप्तशतीच्या चौथ्या अध्यायाचे पठण केले जाते. या सेवेनंतर प्रशिक्षणार्थींकडून विचारल्या जाणाऱ्या शंकांचे योग्य प्रकारे निरसन केले जाते. शंका-समाधानानंतर विश्रांती घेतली जाते.
रविवारी (ता. २३) प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. शनिवार (ता. २९)पर्यंत प्रशिक्षण घेतले जाणार आहे. २९ ला कमला एकादशी असून, गुरुपीठाच्या अष्टदलातील श्री स्वामी महाराजांच्या मूर्तीवर नवोदित याज्ञिकींकडून षोडशोपचारे अभिषेक-पूजा करून घेण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी अनुभवी १५ याज्ञिकींची टीम कार्यरत असून, स्तोत्र-मंत्र शास्त्रार्थ आणि वैज्ञानिक महत्त्व याविषयी प्रामुख्याने मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षणात युवा पुरुष व महिला सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. हा उपक्रम विनामूल्य राबविला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.