Saptshrungigad News esakal
नाशिक

Nashik News : सप्तशृंगगडासाठी हवा पर्यायी घाटरस्ता !

सकाळ वृत्तसेवा

वणी : आदिमायेचे अतिप्राचीन स्वयंभू पूर्ण चौथे आद्यशक्तीपीठ म्हणून तसेच देशातील ५१ शक्तीपीठांपैकी एकमेव आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणून सप्तशृंगीगडाचा उल्लेख सर्वत्र होऊ लागला आहे.

अशा आद्यशक्तिपीठात राज्यासह देशभरातील भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे सप्तशृंगगडावर आदिमायेच्या दर्शनासाठी भाविकांना जाण्या येण्यासाठी पर्यायी स्वतंत्र मार्गाची गरज निर्माण झाली आहे. सध्या गडावर जाण्यासाठी एकच मार्ग आहे.

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील पाच महिन्यांपूर्वी आदिमायेच्या मूर्तीचे स्वरूप संवर्धन कार्यादरम्यान सुमारे १८०० किलो शेंदुराचे कवच काढल्यानंतर आदिमायेची मूळमूर्ती प्रगट होऊन समोर आल्याने आदिशक्ती सप्तशृंगीगडावर भाविकांचा दर्शनासाठी ओघ वाढला आहे. (Alternative Ghat Road need for Saptshringigarh Nashik News)

नाशिक (रामतीर्थ), त्र्यंबकेश्वर, शिर्डी, नस्तनपूर, चंदनपुरी, चांदवड, मांगीतुंगी या सर्व तीर्थस्थळांपासून वणी गड हा ६० ते १२० किमीवर तर गुजरातमधील सापुतारा या पर्यटनस्थळासह अवघ्या चाळीस किमीवर आहे.

जवळच वणी गावातील जगंदबा माता, जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र संभवनाथ शखेश्वर मंदिर, श्री दत्तात्रयांचे आजोळ करंजी देवस्थान, पाराशरी आश्रम, दिंडोरी येथील स्वामी समर्थ मुख्य केंद्र, अहिवंतवाडी, धोडप किल्ला, हतगड ही धार्मिक व पर्यटनस्थळे आहेत. यामुळे भाविकांची संख्या वाढत चालली आहे.

गडावर नवरौत्सव, चैत्रोत्सव, कावड यात्रा या प्रमुख उत्सवांबरोबरच धनुर्मास, शांकबरी नवरात्रोत्सव अशा प्रकारचे वर्षभर वेगवेगळे धार्मिक उत्सव साजरे होत असल्याने या काळात दररोज लाखो भाविक गडावर येत असतात.

गडावर वाहानांद्वारे जाण्यासाठी नांदुरी - सप्तश्रृंगीगड हा १० किमी अंतराचा एकच घाट रस्ता असल्याने यात्रोत्सव काळात भाविकांची वाहानांची कोंडी होऊन रस्ता बंद होण्याबरोबरच सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद केला जातो. इतर वेळीही भाविकांचा राबता कायम असतो. त्यात उन्हाळी सुट्टया, दीपावली व नाताळच्या सुटट्यांच्या दिवशी या मार्गावर वाहनांची रांगा लागून वाहतुकीची कोंडीही सातत्याने होत असते.

या मार्गावर अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. नांदुरी - सप्तशृंगीगड १० किमीच्या या घाट रस्त्यात पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने भाविकांच्या सुरक्षतेचा प्रश्न कायमच ऐरणीवर असतो.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट न्यासाच्या तत्कालीन विश्वस्त मंडळाने सप्टेंबर २०१६ व नोव्हेंबर – २०१६ या कालावधीत तत्कालीन केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सप्तश्रृंगीगडावर येण्यासाठी वणी गावाच्या बाजूने चंडीकापूर ते सप्तश्रृंगीगड या पर्यायी घाट रस्ता व सप्तशृंगगड विकास कार्याचा प्रस्ताव सादर केला होता. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यावर शासनाने दखल घेत सप्तशृंगगड येथे ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्त्याच्या बाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करणे बाबत कळवण उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश पारित केलेले होते. मात्र त्यानंतर याबाबत आवश्यक पाठपुरावा होऊ शकलेला नाही.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

यंदाच्या नवरात्रोत्सवात पाचव्या माळेस उसळलेली भाविकांच्या गर्दीने गडासह, नांदुरीकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यावरील वाहतुकीची पाच ते आठ तास कोंडी होऊन भाविक ठिकठिकाणी अडकून पडले होते.

यात निम्यावर अधिक भाविक वाहतूक कोंडीमुळे दर्शन न घेताच परत गेले होते. पुढील काळातही यात्रोत्सव व अन्य कालावधीत गडावर जाण्यासाठी येण्यासाठी एकच मार्ग असल्याने अशा वाहतूक कोंडीच्या घटनांसह आपतकालीन परीस्थित गडावर जाण्या येण्याचा पर्यायी मार्ग नसल्याने भाविकांच्या सुखसुविधेसह प्रचलित घाट रस्त्यावरील अपघाताच्या नियंत्रण व वाहतूक सुरक्षतेसाठी नवा पर्याय उपलब्ध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

वनविभागाने परवानगी द्यावी

पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे सप्तशृंगीगड विकास आराखडा संदर्भात झालेल्या आढावा बैठकीतही गडावर जाण्यासाठी व येण्यासाठी स्वतंत्र मार्गाची गरज असल्याचे पालकमंत्रींनी सांगत पर्यायी मार्गाबाबात सकारात्मकता दर्शविली. वणी बाजूकडून गडावर येण्या जाण्यासाठी वणी गावाच्या बाजूने चंडीकापूरमार्ग सप्तशृंगीगड या पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण व रस्त्याच्या कामास मंजुरी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वन विभागाने घाट रस्त्याच्या पर्यायी मार्गाला हिरवा कंदील दर्शवला तर हे काम मार्गी लागू शकेल.

नवीन पर्याय मार्गामूळे होणारे फायदे...

- नवीन मार्गामुळे गडावरील इतर धार्मिक स्थळे, निसर्गसौदर्य व निसर्ग पर्यटनाला नवी चालना मिळेल.

- सप्तशृंगगड व परिसरातील सर्व खेड्यांचे संपूर्ण अर्थकारण बदलू शकते.

- चंडीकापूर मार्गे घाट रस्ता झाल्यास नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, सापुतारा बाजूने येणाऱ्या भाविकांना सोयीचे होईल.

- यात्रोत्सव काळात तिरुपतीच्या धर्तीवर येण्याजाण्यासाठी एकेरी मार्ग म्हणून उपयोगी ठरेल.

- आपतकालीन परिस्थितीत पर्यायी रस्ता म्हणून उपलब्ध होवू शकेल.

- वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याबरोबरच अपघातांचे प्रमाण कमी होवू शकेल..

- वणी बाजूने गडावर जाणाऱ्या पदयात्रेकरुंनाही रडतोंडी (साठ पायऱ्या) पायी मार्गास पर्यायी रस्ता मिळेल..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT