Nashik News : गेल्या वर्षभरापासून नाशिक शहरातील महापालिकेवर प्रशासकीय राजवट असल्यामुळे नागरिकांना जिवंतपणीच अनेक समस्या सहन कराव्या लागत असताना आता मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत असल्याचे विदारक चित्र ‘याचि देही याचि डोळा’ बघायला मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये मनपा प्रशासकीय राजवटीबद्दल तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.(Ambad graveyard is in bad condition nashik news)
अंबड गावामध्ये दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी १७ नोव्हेंबरला अंबड गावाच्या स्मशानभूमीत करण्याचे ठरले. एकाच दिवशी दोन जणांचे मृतदेह आणण्याची वेळ आली. मात्र एक बेड सुस्थितीत, तर दुसरा बेड मात्र पूर्णपणे नादुरुस्त असल्याचे चित्र आलेल्या नातेवाईक व मित्र परिवाराला बघायला मिळाले.
त्यामुळे दोन्हीकडचे मंडळी धर्मसंकटात पडले. अशा वेळी सामंजस्याने एकच अंत्यविधी उरकण्यात आला. तर दुसऱ्या अंत्यविधीसाठी लागणारा दुसरा नादुरुस्त बेड स्वखर्चाने दुरुस्त करण्यात आला.
नागरिकांना हव्यात मूलभूत सुविधा
गेल्या वर्षभरापासून नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे मूलभूत सुविधांची वाट लागली आहे. नागरिकांना आपल्या समस्या सांगण्यासाठी आता नगरसेवक नाहीत. माजी नगरसेवकांचे आता तर काही धकत नाही.
मनपा आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मात्र आता कुणाचाही वचक राहिलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर महापालिकेच्या निवडणुका व्हाव्यात व मूलभूत सुविधांचा आम्हाला लाभ मिळावा, अशी चातकासारखी वाट नागरिक बघत आहेत.
''सप्टेंबर २०२२ मध्ये मनपा शहर अभियंता यांना यासंदर्भात निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्या वेळी दोन्हीही बेड दुरुस्त करून देण्याचे आश्वासन शहर अभियंता यांनी दिले होते.
त्यानंतर दोन बेडपैकी एक बेड दुसऱ्याच दिवशी दुरुस्त करून देण्यात आला. परंतु एक वर्ष उलटूनही मनपाला दुसरा बेड दुरुस्त करण्यासाठी वेळ मिळू नये, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.''- शरद दातीर, शाखाप्रमुख, शिवसेना, अंबड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.