Hospital esakal
नाशिक

Nashik News: अंबड एमआयडीसी ESIC रुग्णालयाचा प्रस्ताव पुन्हा नाकारला

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ इएसआयसी रुग्णालयांची उभारणी केली जाणार असल्याची माहिती, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे.

पण गेल्या अनेक वर्षांपासून अंबड औद्योगिक वसाहतीमधील वाढती कामगार वर्गाची संख्या लक्षात घेता अंबड परिसरात नवीन इएसआयसी रूग्णालयाचा प्रस्ताव मात्र पुन्हा नाकारण्यात आला आहे. (Ambad MIDC ESIC hospital proposal rejected again Nashik News)

नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या इएसआयसी बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील बिबवेवाडी (पुणे) येथे इएसआयसी रुग्णालयातील खाटांची क्षमता शंभरवरून १२० करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, अंधेरीमध्ये ५०० खाटांच्या बहुशाखीय रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली आहे.

त्यात सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. कायमचे अपंगत्व आल्यास मिळणारे लाभ, तसेच कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांना मिळणारे लाभ वाढविण्याविषयीही बैठकीत मंजुरी देण्यात आली.

महाराष्ट्र राज्यासोबतच, गुजरातमध्ये सतरा ठिकाणी नवीन दवाखान्यांची उभारणीही केली जाणार आहे, तर, ओरिसातील राऊर केलामधील रुग्णालयात खाटांची संख्या ७५ वरून दीडशे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

१९८० ते ९० दशकातील सातपूर, अंबडमधील औद्योगिक कामगारांची पन्नास हजार कामगारांची संख्या लक्षात घेऊन सातपूरला पन्नास खाटांचे रूग्णालय उभारले.

त्यानंतर मात्र जिल्हाभरात औद्योगिक वसाहतीचा विस्तार पाहता आता कामगारांची संख्या किमान सात ते दहा लाखाच्या घरात आहे.

याचा विचार करता अंबडला स्वतंत्र रूग्णालयाची गरज आहे. तशी अनेक वर्षांपासून मागणी असून, या वेळीही दुर्लक्ष केल्यामुळे कामगार संघटनानी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT