Fire News esakal
नाशिक

Nashik News : अंबासनच्या कचरा डेपोला आग; ग्रामपंचायत प्रशासनाच्या सतर्कतेने आग आटोक्यात

दीपक खैरनार -सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील डोंगराच्या पायथ्यालगत असलेल्या (कचरा डेपो) डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याच्या ढिगा-याला अज्ञात वेडसर व्यक्तीने आग लावल्याने ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच दमछाक उडवून दिली दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाच्या समयसूचकतेने आग आटोक्यात आणण्यात आली असून पुढील अनर्थ टळला आहे.

गावातील स्वच्छता राहण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावालगत असलेल्या खंडेराव महाराज डोंगरालगत कचरा डेपो तयार केले असून या डेपोमध्ये घंटा गाडीच्या माध्यमातून गावातील कचरा गोळा करून टाकला जातो. (Ambasan waste depot fire vigilance of Gram Panchayat administration brought fire under control Nashik Fire News)

कचरा डेपोच्या काही अंतरावर वनविभागाचे जंगल क्षेत्र आहे मात्र काही वर्षांपूर्वी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्याने ओस पडले आहे. शुक्रवार (ता.१६) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एका अज्ञात वेडसर व्यक्तीकडून डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याला आग लावण्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्यांकडून टॅकरने कचऱ्यातून निघणा-या धुराचे लोट दिसत होते त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य व तरूणांनी पाण्याचा मारा केला व अथक प्रयत्नांनंतर निघणारे धुराचे लोट कमी झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दिवसभर वातावरणात हवेचा वेग जास्त असल्याने जवळ असलेल्या जंगलात आग लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

"आम्हाला कचरा डेपोला कुणीतरी वेडसर व्यक्तीने आग लावल्याची माहीती मिळताच पाण्याचे टॅकर उपलब्ध करून आग आटोक्यात आणली सुदैवाने कुठलीच नुकसान झाली नाही."

विजय गरूड, ग्रामपंचायत सदस्य अंबासन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT