जुने नाशिक : अंत्ययात्रेसाठी महापालिकेच्या शववाहिकांच्या रथाच्या बॅटऱ्या चोरीला जाऊन आठ दिवस उलटूनदेखील महापालिकेकडून नवीन बॅटऱ्यांची व्यवस्था न झाल्याने दोन्ही शववाहिका रथ धूळखात पडून आहे. त्यामुळे दफनविधीसाठी रथ उपलब्ध होत नसल्याने मुस्लिम बांधवांची फरपट सुरू आहे. मृतदेह नेण्यासाठी अतिरिक्त खर्च करून खासगी वाहनातून कब्रस्तानापर्यंत मृतदेह न्यावे लागतात.
बॅटऱ्या चोरीमुळे शववाहिकेसाठी परवड
मुस्लिम समजातील मृतांना दफनविधीसाठी घेऊन जाणारे कब्रस्तान बहुतांशी जुने नाशिक परिसरात आहे. शहरातील विविध भागांतील मुस्लिम समाजातील मृतदेह दफनविधीसाठी या भागात येतात. विविध भागांतून मृतदेहास दफनविधीसाठी आणण्यासाठी शववाहिकांची अडचण भासू नये यासाठी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी त्यांच्या निधीतून दोन रथ उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे त्याच, रथाचा दफनविधीसाठी उपयोग होतो आहे. रथासाठी फोन केला, की बॅटऱ्या चोरीस गेल्या आहेत, रथ येऊ शकत नाही, उत्तर ऐकावे लागते.
आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला...
आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला, त्यात मृतदेहास कब्रस्तानापर्यंत घेऊन जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याची वेळ मृत बांधवांच्या कुटुंबीयांवर येत आहे. शनिवारी (ता. ५) असाच एक प्रकार घडला आहे. आरटीओ कॉलनीतील एका मृत बांधवाच्या दफनविधीसाठी रथाची आवश्यकता होती. कुटुंबीयांनी रथासाठी फोन केल्यावर त्यांना बॅटऱ्या चोरी गेल्याने रथ मिळणार नसल्याचे उत्तर मिळाले. त्यांची आर्थिक परिस्थिती काहीशी चांगली असल्याने त्यांनी खासगी वाहनाचा वापर केला. बहुतांशी कुटुंबीयांना ते शक्य नाही, त्यांचे काय. ‘असून अडचण नसून खोळंबा ’ अशी परिस्थिती (एफएच १५, जीव्ही ६२३३) आणि (एफएच १५, जीव्ही ६२३४) अशा दोन्ही शववाहिकांची झाली आहे.
हेही वाचा - संशयास्पद दिसणाऱ्या बुलेटच्या सीटखालून मिळाल्या धक्कादायक गोष्टी; पोलीसांच्या तपासणीत खुलासा
महापालिकेचे दुर्लक्ष
जनाजा रथाच्या बॅटऱ्या चोरी होऊन आठ दिवस उलटले आहेत. दफनविधीसाठी ते उपलब्ध होत नाहीत. मुस्लिम समाजास भासणारी आवश्यकता लक्षात घेता महापालिकेकडून बॅटरी उपलब्ध करून देणे गरजेचे होते. ते केले नसल्याने मुस्लिम समाजबांधवांना अडचण भासत आहे.
हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले
जनाजा रथाच्या बॅटऱ्या चोरी झाल्याचे कारण दिले जात आहे. गरजूंना रथ उपलब्ध होत नाही. मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने त्वरित रथास बॅटऱ्या उपलब्ध करून द्याव्यात. नागरिकांची होणारी फरपट थांबवावी. -मोईनोद्दीन शेख, सामाजिक कार्यकर्ता
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.