वेहेळगाव (जि.नाशिक) : राज्य सरकारने (state government) कोरोना महामारी (corona pandemic) रोखण्यासाठी जिल्हाबंदीचे निर्देश (lockdown) जारी केले. महत्त्वाचे काम असेल तर जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास (E-pass) घ्यायचा, असा निर्णय जाहीर केला आहे; परंतु नाशिक व जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर (border) कोणतीही तपासणी होत नसल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता. ५) प्रसिद्ध झाल्यानंतरही हद्दीच्या वादात जळगाव-नाशिक सीमेवरील अमोदे फाटा (नांदगाव) येथे कुठल्या प्रकारचे चेक पोस्ट (check post) सुरू करण्यात आलेले नाही. ( Amode Fata check post not started )
सीमावर्ती भागातून सहजरीत्या वाहतूक
या ठिकाणी चेक पोस्ट नसल्याने जळगाव जिल्ह्यातून नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षी अमोदे फाटा येथे चेक पोस्ट असल्याने चाळीसगाव व नांदगाव पोलिस कर्मचारी तैनात केल्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर निर्बंध लावण्यात आले होते. सध्या पोलिस कर्मचारी नसल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून जिल्हा सीमेवर चेक पोस्ट सुरू करण्याची मागणी होत आहे.
वरिष्ठांच्या चेक पोस्टबाबतच्या आदेशान्वये जळगाव व औरंगाबाद सीमेंतर्गत न्यायडोंगरी व कासारी येथे चेक पोस्ट उभारून आमचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अमोदे फाटा हे मेहुणबारे पोलिस ठाणे हद्दीजवळ असल्याने त्यांनी तेथे चेक पोस्ट तयार करावा. या संदर्भात वरिष्ठांनी त्यांच्याशी संपर्क केला आहे.
-अनिल कातकडे, पोलिस निरीक्षक, नांदगाव
आम्ही मेहुणबारे पोलिस ठाणे हद्दीतील साकूर फाटा व तळवाडे बारी येथे चेक पोस्ट उभारून आमचे आठ कर्मचारी तेथे तैनात केलेले आहेत. अमोदे फाटा हे नांदगाव पोलिस ठाणे हद्दीत येत असल्याने त्या ठिकाणी त्यांनीच चेक पोस्ट उभारावा.
-पवन देसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.