Nashik News : परिसरातील गोरेवाडी येथील दहाचाळीच्या मनपा शाळेच्या जवळ एका बाभळीच्या झाडाला टांगलेल्या बाहुल्यांच्या माध्यमातून जादूटोण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षणात बाभळीच्या झाडाला लावलेल्या लिंबू, मिरच्या, बाहुल्या उतरवल्या. (andhshraddha nirmulan samiti activists unloaded dolls under police protection from witchcraft Nashik News)
गोरेवाडी येथे अमावस्येच्या दिवसानंतर नागरिकांना बाभळीच्या झाडाला लिंबू मिरच्या विशिष्ट मजकूर लिहिलेली कागदे पासपोर्ट साईज फोटो खिळ्याच्या साह्याने ठोकण्यात आले होते. तसेच लोकांच्या मनामधील इच्छा लिहिलेल्या चिठ्ठ्या देखील आढळल्या.
या जादूटोण्याच्या प्रकाराच्या संदर्भाने जनजागृती करण्यासाठी आणि झाडाला टांगलेल्या बाहुल्या काढून टाकण्यासाठी अंनिसतर्फे नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या अंमलदारांना रविवार (ता. २३) रोजी निवेदन देण्यात आले होते.
दुसऱ्याच दिवशी म्हणजेच सोमवार (ता.२४) रोजी अंनिसचे राज्यपदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये त्या बाहुल्या काढून टाकत स्थानिक लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली भीती दूर केली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
या मोहिमेमध्ये समितीचे राज्य कार्यवाह प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांचे नेतृत्वात राज्य पदाधिकारी राजेंद्र फेगडे, नाशिक रोड शाखेचे सचिव विजय खंडेराव, सदस्य राजेश जाधव, राजेश शिंदे, पोलिस शिपाई नासिर शेख आणि विश्वास घुले यांनी सहभाग घेतला.
"ज्या नागरिकांनी अशा स्वरूपाच्या कृत्यांमध्ये अंधश्रद्धेतून सहभाग दिला असेल, त्यांचे तांत्रिक, मांत्रिक, भगताकडून वेगवेगळ्या स्वरूपाचे शोषण झालेले आहे, फसवणूक झालेली असेल त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी. महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा अमलात असल्याने अशा स्वरूपाची तक्रार दाखल झाल्यानंतर नक्कीच भोंदूबाबावर कायदेशीर कार्यवाही नाशिक रोड पोलिसांच्या मदतीने करता येईल." - डॉ. सुदेश घोडेराव, राज्य कार्यवाह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.