Angry parents put lock on zp school nashik news esakal
नाशिक

Nashik ZP School: संतप्त पालकांनी लावले शाळेला कुलूप; शिक्षकांनी बाहेरच भरविली शाळा

भाऊसाहेब गोसावी

Nashik ZP School: वाद (ता चांदवड) येथील जिल्हा परिषद शाळेला सहा महिन्यांपासून शिक्षक नसल्याने पालकांनी आज शाळेचे गेट उघडू दिले नाही. शिक्षक देणार नसाल तर आमच्या मुलांचे दाखले द्या अशी मागणी पालकांनी केली आहे. (Angry parents put lock on zp school nashik news)

वाद येथे पहिली ते पाचवीपर्यंत चे पाच वर्ग असून एकूण नव्वदच्या आसपास विद्यार्थी संख्या आहे. येथे सहा महिन्यांपासून फक्त दोनच शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. तिन शिक्षकांच्या जागा मंजूर असून एका शिक्षकाची बदली झाल्यानंतर सहा महिन्यांपासून एक जागा रिक्त आहे.

सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती सह पालकांनी आतापर्यंत अनेक वेळा शिक्षक देण्याची मागणी केली आहे. तरीही शिक्षक मिळाला नसल्याने आज पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पालकांनी कुलूप लावल्याने शिक्षकांनी बाहेरच भरविली शाळा

आजच्या आज शिक्षक दिला नाही तर पालकांनी आपल्या मुलांचे दाखले शाळेतून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक मिळावा या मागणीसाठी दिवाळीनंतर आज जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या.

आज पालकांनी वाद येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावलं आहे. यावेळी सरपंच प्रविण आहेर , ग्रामपंचायत सदस्य अंकुश आहेर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाडे, उपाध्यक्ष योगेश पवार, भाऊसाहेब आहेर, कारभारी शिंदे, बाळु खताळ, नंदु देवरे, खंडू गोरसे, बाळु भालेराव, केशव हारपडे, शिवाजी कुंभार्डे, योगेश पवार, सागर सोनवणे, दिनकर आहेर, विकास आहेर ,पिराजी भालेराव , योगेश घाडगे, किरण खताळ आदींसह पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT