technology esakal
नाशिक

Nashik News : विश्वासार्हता, मूल्य जपण्याची सहकारवर जबाबदारी : अनिल कवडे

अत्याधुनिक तंत्रज्ञान सतत बदलत असून, यातून स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी ग्राहक केंद्रीत ठेवत सहकार विभागाला काम करावे लागेल.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अत्याधुनिक तंत्रज्ञान सतत बदलत असून, यातून स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी ग्राहक केंद्रीत ठेवत सहकार विभागाला काम करावे लागेल.

संवाद साधत, विश्वासार्हता, मूल्यांची जपणूक करण्याची मोठी जबाबदारी आता सहकार विभागावर आलेली आहे. (Anil Kawade statement on Trustworthiness Responsibility of Cooperatives to Preserve Value nashik news )

ही जबाबदारी बॅंका, पतसंस्था, सहकारी संस्थांनी पेलल्यास सहकाराचा पाया मजबूत होईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले. नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद २०२३-२४ सुरू असून, रविवारी (ता. २८) सहकार चिंतन व शाश्वत मूल्यांची विश्वासार्ह परंपरा चर्चासत्र झाले. यात अध्यक्षस्थानावरून आयुक्त कवडे बोलत होते.

कवडे म्हणाले, की सामान्यांची गरिबी, दारिद्र्य कमी करण्याचा प्रयत्न सहकारातून होणे गरजेचे आहे. सहकारात काम करताना मूल्यनिष्ठ महत्त्वाचे आहे. सहकारातील मूल्यांचे पालन करण्याची जबाबदारी कोणा एकाची नसून, ती सामूहिक आहे. जागतिकीकरण, आधुनिकीकरण होत असताना आपणे नेमके कोठे आहोत, याचे आत्मचिंतन आवश्यक आहे.

सर्वांगीण विकास साध्य करताना युवकांचा सहभाग सहकार क्षेत्रात वाढविणे गरजेचे आहे. संवाद, सद्‌भावना, सत्कार्य व समाधान करण्याच्या दृष्टीने सेवा ग्राहकास दिल्यास मूल्यांची जपणूक होईल. यास आपुलकीची जोड दिल्यास पर्यायाने सहकार मजबूत होण्यास मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले. आगामी सहकार धोरण होऊ घातले आहे.

यात शाश्वत मूल्य, विश्वासार्हता कमी होणार नाही, असे काम करण्याची जबाबदारी सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांना पेलावी लागणार असल्याचे आयुक्त कवडे यांनी सांगितले. तरुणांची संख्या मोठी असून, त्यांनी सहकारात येऊन काम केले पाहिजे. शहरी व ग्रामीण ही दरी दूर करून सहकाराचा विस्तार करण्याची आवश्यकता असल्याचे वैशाली आवाडे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार क्षेत्राला झेप घेण्यासाठी सुधारणा करणे गरजेचे आहे. सामूहिक नेतृत्व, व्यावसायिकेता स्वीकार करीत आधुनिकतेची कास धरावी, असे सीताराम अडसूळ यांनी सांगितले. ग्राहक केंद्रस्थानी ठेवून समतोल साधत, काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करीत सहकारात काम केल्यास सहकाराचा उद्धार होईल, असा विश्वास अजय मुंदडा यांनी व्यक्त केला.

चर्चासत्रात श्रीराम देशपांडे, विश्वास ठाकूर यांनी सहभाग घेतला. या वेळी गुलाबराव देवकर, मुकुंदकुमार कळमकर, अर्जुन गाढे, विजय ढेरे, अनिल देसाई, राजगोपाल मणियार, अशोक झंवर, अमृता पवार, वसंतराव नगरकर, भालचंद्र पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, नानासाहेब सोनवणे, वसंत खैरनार, सत्यनारायण लोहिया, किशोर राजवाडे, राकेश गुप्ता, माधवराव मोरे, भास्कर शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT