Heat e sakal
नाशिक

October Heat: ऑक्टोबर हिटच्या तडाख्याने पशू-पक्षी बेजार! मोसम खोऱ्यात पारा वाढल्याने अंगाची लाही लाही

प्रशांत बैरागी

October Heat : पावसाळा संपल्यामुळे काही दिवसांपासून उन्हाच्या असह्य झळा सहन कराव्या लागत आहेत. ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे शहरासह मोसम खोऱ्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे.

त्यामुळे नागरिकांसह पाळीव प्राणीही कमालीचे बेजार झाले आहेत. वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणेच पशू-पक्ष्यांनाही होत आहे. (Animals and birds are tired of impact of October heat mercury rose in monsoon valley body became limp Nashik)

प्रत्येक जण गॉगल, टोपी, स्कार्फ, रूमाल घेऊनच घराबाहेर पडत आहे. उन्हाचा चटका, घामाघूम अवस्था यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातून सुटका व्हावी, म्हणून थंड पाणी, सरबत, लस्सी, लिंबू सरबत यांचा आधार घेत आहे.

उन्हामुळे माणसाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्राव होतो. मात्र वाढत्या उष्म्याने त्रस्त पशू-पक्ष्यांचे काय, असा प्रश्न साहजिकच पडत आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून पशुपक्ष्यंची काळजी घेण्याचा सल्ला पशुवैद्यकीय अभ्यासक डॉ. नवल खैरनार यांनी यांनी दिला आहे.

माणूस व प्राण्यांमध्येही काही लक्षणे सारखी दिसतात. उन्हापासून वाचण्यासाठी पशू-पक्षी सावलीत बसतात. मात्र सावलीत बसून फार काळ पशू-पक्ष्यांचा बचाव होऊ शकत नाही.

ज्या प्राण्यांना उष्म्याचा फटका बसतो, त्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका बसतो. पक्षी उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. यामुळे त्यांना दम लागतो. तसेच हिटस्ट्रोक होतो.

"उन्हापासून वाचण्यासाठी पशू-पक्षी झाडांचा आधार घेतात. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत, त्यांनी कडाक्याच्या उन्हात प्राणी, पक्ष्यांना योग्य, समतोल असा आहार द्यावा. घराच्या बाहेर एखाद्या भांड्यात पाणी ठेवावे. यामुळे पशू-पक्ष्यांची तहान भागू शकते."

-राजाराम आहिरे, सामाजिक कार्यकर्ते

अशी घ्या काळजी...

*घरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो

*प्राण्यांना पहाटे, सायंकाळी फेरफटक्यासाठी घेऊन जावे

*चिकन, मटण, मासे हे प्राण्यांचे आवडते खाद्यपदार्थ असले तरी ते उन्हाळ्यात देऊ नये

*मांसाहारी पदार्थ पचण्यास जड असतात. त्यामुळे प्राण्यांना जुलाब, उलटी होऊ शकते

*प्राण्यांचे जेवण नेहमी ताजे असावे

*खिडकी, बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे

*पाळीव प्राण्यांना उन्हात बांधू नये

*आजारी पडलेल्या प्राण्यांना स्वत:च उपचार देण्याऐवजी पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT