Anjaneri to Brahmagiri ropeway will be constructed of 5 km nashik news (File Photo) esakal
नाशिक

Anjaneri Brahmagiri Rope Way : अंजनेरी ते ब्रह्मगिरी 5 किलोमीटरचा रोप वे : हेमंत गोडसे

सकाळ वृत्तसेवा

Anjaneri Brahmagiri Rope Way : जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटनास चालना मिळावी, यासाठी त्रंबकेश्वर तालुक्यात अंजनेरी- ब्रह्मगिरी दरम्यान रोपवे होणार आहे.

प्राथमिक अहवाल व प्रकारची व्यवहार्यता तपासणी आणि त्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) चे काम पूर्ण झाल्यानंतर आता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीने प्रस्तावित अंजनेरी -ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

खासदार हेमंत गोडसे यांनी ही माहिती दिली. (Anjaneri to Brahmagiri ropeway will be constructed of 5 km nashik news)

खासदार गोडसे म्हणाले, की रोपवेच्या कामाविषयीची निविदा कंपनीने ३१ जुलैपर्यंत मागविल्या असून आता लवकरच रोपवे प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे.

अंजनेरी हे रामभक्त हनुमान यांची जन्मस्थान असून ब्रह्मगिरी पर्वतावर शिवशंकरांनी जटातून गोदावरीचा उगम झाल्याच्या आख्यायिका असून, या भागातील धार्मिक महत्त्व विचारात घेउन अंजनेरी आणि ब्रह्मगिरी हे पवित्र धार्मिकस्थळांना जोडणारा रोप वे उभारण्यात येणार आहे.

अंजनेरी आणि ब्रह्मगिरी हे दोन्ही पर्वत अति उंच असल्याने मनात असूनही भाविक आणि पर्यटक त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत.भाविकांना अंजनेरी आणि ब्रह्मगिरीवर जाणे सोपे व्हावे यासाठी अंजनेरी -ब्रह्मगिरी या धार्मिक पर्वतांना जोडणारा रोपवे उभारण्याचा प्रस्ताव खासदार गोडसे यांनी मांडला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यानच्या काळात राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीचे प्रकाश गौर, प्रशांत जैन, एन. सी. श्रीवास्तव यांनी अंजनेरी, ब्रह्मगिरी पाहणी केली होती. दिल्ली दरबारी सतत पाठपुरावा करून प्रस्तावित अंजनेरी -ब्रह्मगिरी रोपवे विषयीच्या सर्व व्यवहार्यता यशस्वीपणे तपासणीनंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम लवकरात लवकर सुरू करण्याकामी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करावी, यासाठी केंद्राकडे सततचा पाठपुरावा सुरू होता.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीने अंजनेरी -ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. निविदा प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ जुलैपर्यत असणार आहे. अंजनेरी -ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्पाचा मुख्य कंट्रोल रूम मध्यवर्ती पेगलवाडी येथे असणार आहे. रोपवेची लांबी ५.७ किलोमीटर असणार असून या प्रकल्पावर होणारा खर्च सुमारे पावणेचारशे कोटी रुपये होणार असल्याचेही खासदार गोडसे यांनी सांगितले.

- ब्रह्मगिरी ते अंजनेरी रोप वे

- लांबी ५.७ किलोमीटर

- खर्च ३७६.७३ कोटी

- कालावधी २४ महिने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT