Ankai Fort Latest Marathi news esakal
नाशिक

Ankai Fort : आवडते पर्यटनस्थळ; स्वप्नवत सौंदर्यामुळे पर्यटकांचा ओढा

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : दगडांची आखीव रचना, घुमटाकार आकार, हिरवा शालू परिधान केलेली हिरवीगार डोंगररांग, कड्याकपाऱ्यांतून खळाळणारे पाणी, एकेक पायरी अन मधूनच गुळगुळीत भागातून चढण्याची मजा, उंचउंच अन समोर दिसणारे डोंगर जणू क्षणाक्षणाला रंगाची उधळण करताय..,

आकाश्यातील ढगांची किल्यावर गर्दी आणखीच विलोभनीय अशा स्वप्नवत वातावरण...हे सगळे जणू आपल्या स्वागतासाठीच आहे...असे नजरेत साठवणारे दृश्‍य पर्यटकांना भुरळ घालणारे असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे, किल्ला जणू आवडते पर्यटनस्थळच बनले आहे. (Ankai Fort is favorite tourist spot in monsoon nashik Latest Marathi News)

ऐतिहासिक व धार्मिक संदर्भ लाभलेल्या अनकाई किल्ल्यावर श्रावणातील चारही सोमवारी मोठी यात्रा भरते. यात्रेचा आज पहिला दिवस असल्याने नेहमीप्रमाणे अनेक भाविकानी हजेरी लावली. किल्यावर पावसाळा सुरू झाला, की सर्वत्र हिरवा शालू पांघरला जातो.

श्रावणातील सरीवर वातावरण अधिक खुलून जाते. विकासकामांमुळे किल्याचे सौंदर्य अधिकच खुलल्याने व निसर्गप्रेमीची संख्याही वाढल्याने येथील पर्यटकांत दुपटीने वाढ झाल्याचे चित्र आहे.

किल्ल्यावर समाधी घेतलेल्या अगस्ती ऋषीची भरते. नगर-मनमाड महामार्ग तर मनमाड-नांदेड रेल्वे मार्गालगत असलेला हा किल्ला सोळाव्या शतकापासून तालुक्याची शान म्हणून उभा आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत तपश्चर्या करून अगस्ती ऋषी दंडकारण्यातील पंचवटीकडे निघाले होते.

प्रवासात अनकाई किल्ला व त्याचा निसर्गरम्य परिसर आवडल्यामुळे त्यांनी या किल्ल्यावरच तपश्चर्या करून समाधी घेतली. या समाधीच्या दर्शनासाठी श्रीराम व लक्ष्मणही येथे आल्याचा उल्लेख आढळतो.

किल्ल्यावर काय काय आहे?

किल्ल्यावर अगस्ती ऋषींचे छोटे मंदिर व आश्रमही असून येथेच श्रावणात चारही सोमवारी यात्रा भरते. किल्ल्यावर वर्षभर पाणी असणारे ३० फूट खोलीचे तळे असून अगस्ती नदीचा उगम या तळ्यापासून होत असल्याचे मानले जाते.

या किल्ल्या शेजारीच गोरक्षनाथांची टेकडी, तर किल्ल्यावर कानिफनाथांचे मंदिर आहे.किल्ल्यावर अजिंठा लेण्यांच्या समान जैन धर्मीयांच्या दहा लेणी आहेत. यात देवतांच्या मूर्ती,प्राणी,पक्षी, शिल्पे कोरले आहेत.दहाव्या शतकात लेणीनिर्मिती झाली असून गुहा व देवतांच्या मूर्तीही किल्ल्यावर आढळतात.

वर्षभर ट्रेकिंग!

पूर्वी किल्ल्यावर श्रावणातच गर्दी व्हायची. आता वर्षभर हा किल्ला पर्यटकांनी ट्रेकिंगसाठी आवडता किल्ला म्हणून निवडला आहे. येवला-मनमाडसह इतर ठिकाणाहूनही अनेक पर्यटक किल्ला सर करण्यासाठी येतात. रविवारच्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई किल्ल्यावर चढाई करण्यासाठी अनकाईला जाते.

"अनकाई किल्ला गावासाठी भूषण असून याला धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्व आहे. किल्ल्यावर अनेक विकास कामे झाली आहेत तर संवर्धनाच्या दृष्टीने अजून कामे होण्याची गरज आहे. वर्षभर किल्ल्यावर पर्यटक येऊ लागले असून पावसाळ्यात तर किल्ल्याचे देखणे रूप नजरेत साठवण्यासारखं असतं. यामुळे किल्ल्याचे महत्व वाढत आहे."

- अल्केश कासलीवाल, सामजिक कार्यकर्ते, अनकाई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT