Nashik Tribal Development : कामातील दिरंगाई टाळून निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने अन्ट्रावेब टेक्नॉलॉजी, आयसीआयसीआय बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे. (Annual accounts of Tribal Development Corporation will be online nashik news)
या करारानंतर आता महामंडळाचा वार्षिक लेखाजोखा ऑनलाइन होईल. महामंडळाच्या कामाची दखल घेऊन टॅली सॉफ्टवेअरसाठी आयसीआयसीआय बँकेने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.
याबाबत महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्ये दैनंदिन व्यवहार व वार्षिक लेखे टॅली सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाइन करण्याचा निर्णय नाशिक कार्यालयात घेण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या वेळी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, अन्ट्रावेब टेक्नॉलॉजी प्रा. लि.चे प्रतिनिधी अमीज हमजा, अमीन शेख, आयसीआयसीआय बँकेचे प्रतिनिधी शरद ढगे, विनय चंद्रात्रे, महाव्यवस्थापक (वित्त) बाबासाहेब शिंदे आणि संतोष आमटे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.