Nashik Smart City Road Parked cars esakal
नाशिक

NMC News: पार्किंग समस्येवर महापालिकेकडूनच उतारा! 20 ठिकाणी जागा; रस्त्याच्या कडेला वाहन लावल्यास शुल्क वसुली

सकाळ वृत्तसेवा

NMC News : शहरात पार्किंगची समस्या गंभीर होत असून याचा परिणाम हाणामाऱ्या तसेच नागरिकांच्या मानसिकतेवर होत आहे. त्यामुळे यापूर्वी स्मार्टसिटी कंपनीकडून चालविली जाणारी पार्किंग व्यवस्था महापालिकाच चालवणार आहे.

शहरात जवळपास २० ठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देताना त्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. (Answer from NMC on parking problem seats in 20 places Charges levied for parking on side of road nashik)

शहरातील सार्वजनिक वाहतुकीला शिस्त लावण्यासह पार्किंगची कोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि स्मार्टसिटी कंपनीने ‘पीपीपी’ तत्त्वावर स्मार्ट पार्किंग प्रकल्पांतर्गत ३३ ठिकाणच्या पार्किंगच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ट्रायजिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिली.

परंतु, कंपनीने स्मार्ट पार्किंग सुरू करताच कोरोनामुळे ते लगेच बंद पडले. कोरोना तिसरी लाट ओसरल्यानंतर महापालिकेने ट्रायजिन टेक्नोलॉजी कंपनीला पार्किंग स्लॉट सुरू करण्याचे निर्देश दिले. परंतु, आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत ठेकेदाराने महापालिकेकडे अनेक मागणी केल्या.

त्यात ठेकेदाराने प्रायोगिक तत्त्वावर १० ठिकाणी पार्किंग स्लॉट सुरू करून स्लॉटला मिळणारा प्रतिसाद पाहून रॉयल्टीत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यानंतरही पार्किंग स्लॉट सुरू होऊ शकले नाहीत.

ठेकेदार कंपनीने प्रकल्पात १८ कोटींची गुंतवणूक केली आहे. तर कोरोनामुळे आपले आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत, ठेकेदाराने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या १७ लाखांच्या रॉयल्टीत सूट देण्याची मागणी केली.

तसेच दुचाकीसाठी प्रतितास ५ ऐवजी १५, तर चारचाकीसाठी प्रतितास १० ऐवजी ३० रुपये शुल्कवाढीसह तीन वर्षांची मुदतवाढ मागितली. परंतु शुल्कवाढीला नकार देण्यात आला.

बचतगटांना मिळणार काम

शहरात सर्वात मोठी समस्या पार्किंगची आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने दिसेल, त्या जागेवर वाहने लावली जातात. त्यातून वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. पार्किंग नसल्याने बाजारपेठेत दररोजचे होणाऱ्या वादामुळे मानसिकता बिघडली आहे.

मध्यंतरी पोलिसांनी महात्मा गांधी रस्त्यावरील बेशिस्तीत उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई केल्यानंतर गोंधळ उडून पोलिस विरुद्ध व्यापारी असा संघर्ष निर्माण झाला. एमजी रोडवर व्यापारी गाळ्यांमध्ये पार्किंगसाठी जागा असूनही तेथे वाहने लावली जात नाही.

स्मार्ट रस्त्याचा वापर पार्किंगसाठी केला जात आहे. महापालिकेचे पार्किंग नसल्याने खासगी पार्किंग व्यवसाय तेजीत आला आहे. या सर्व परिस्थितीत व्यवस्था होत नसल्याने महापालिकेने पुढाकार घेऊन पार्किंगचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात निकाली काढण्याचा निर्णय घेतला.

समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्याकडे बैठक झाली. त्यामध्ये महापालिकेने स्वतःचं पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती श्री. चौधरी यांनी दिली. बचतगटाच्या माध्यमातून पार्किंग चालविले जातील, त्यासाठी शुल्क आकारणी होईल.

येथे होईल पार्किंग (वाहनांची क्षमता)

शरणपूर रोड, कुलकर्णी गार्डन (२६)

कॅनडा कॉर्नर बीएसएनएल ऑफिस (६६)

ज्योती स्टोअर्स गंगापूर नाका (२४०)

प्रमोद महाजन उद्यान, गंगापूर रोड (८३)

गंगापूर नाका ते जेहान सर्कल (५९३)

जेहान सर्कल ते गुरुजी रुग्णालय (१६५)

जेहान सर्कल ते एबीबी सर्कल (७८७)

गुरुजी रुग्णालय ते पाइपलाइन रोड (७९)

मोडक पॉइंट ते खडकाळी रोड (७८)

थत्तेनगर (१६४)

शरद पेट्रोलियम ते वेस्टसाईड (२१७)

कॅनडा कॉर्नर ते विसेमळा (११६)

शालिमार ते नेहरू गार्डन (१०५)

"शहरात पार्किंग समस्या गंभीर होत असल्याने आता महापालिकामार्फतच पार्किंग सशुल्क सुरू केली जाणार आहे. बचतगटाच्या माध्यमातून शुल्क आकारले जाईल. वाहतुकीला शिस्त व उत्पन्नात वाढ हे दोन उद्देश साध्य होतील."- प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, महापालिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT