Two-wheeler thieves, deputy commissioner of police circle with two-wheelers and an anti-motorcycle theft squad esakal
नाशिक

Anti Motorcycle Theft पथकाने तडीपार संशयिताकडून केल्या 5 दुचाकी जप्त

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : दोन खुनाचे गुन्हे आणि सध्या तडीपार असलेल्या सराईत संशयितास पोलिस आयुक्तालयाच्या ॲन्टी मोटरसायकल थेप्ट परिमंडळ १ च्या विशेष पथकासह भद्रकाली गुन्हे पथकाने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या. करण अण्णा कडुसकर (२१, रा. अंबड), असे संशयिताचे नाव आहे. (Anti Motorcycle Theft Squad seized 5 bikes from suspect Nashik Crime Latest Marathi News)

संशयित करण कडुसकर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय परिसरात चोरीची दुचाकी विक्रीस येत असल्याची माहिती पथकास मिळाली. वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार, निरीक्षक गुन्हे दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक निरीक्षक अभिजित सोनवणे, ज्ञानेश्वर मोहिते, कर्मचारी प्रभाकर सोनवणे, रमेश कोळी, संदीप शेळके, संतोष पवार, अनिल आव्हाड, इरफान शेख, तुळशीदास चौधरी, विश्वजीत राणे, संदीप रसाळ, श्रीकृष्ण पडोळ, गोरक्ष साबळे, शिवाजी मुंजाळ, धनंजय हासे, सागर निकुंभ, तुकाराम कुंभार आदींनी सोमवार (ता. २९) रात्री आठच्या सुमारास डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय परिसरात सापळा रचला.

संशयित त्या ठिकाणी येताच सापळा रचून अटक केली. चौकशीत त्याच्याकडून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्यात जुने नाशिक गरीब नवाज हॉटेल परिसरातून १९ ऑगस्टला चोरी झालेल्या दुचाकीचा समावेश आहे.

खुनाच्या गुन्ह्यातील संशयित

करण कडुसकर सराईत गुन्हेगार आहे. अल्पवयीन असताना २०१५ मध्ये त्याने अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीत एकाचा खून केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी २०२१ मध्ये दुसरा खून केला. तसेच, अंबड पोलिस ठाण्यात २०२१४ त विविध भागात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहे. २०२१ गंगापूर आणि अंबड हद्दीत घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहे. तर सध्या खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आहे. त्यास तडीपार करण्यात आले आहे. तरीदेखील त्याने शहरातच थांबून दुचाकी चोरी करण्याचे प्रकार सुरू ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT