singer Anuja Deore esakal
नाशिक

‘वरी कोरडं आभाळ’ ला अनुजा देवरेचा स्वरसाज; ‘दार उघड बये’ मालिका शीर्षकगीत

सकाळ वृत्तसेवा

अंकिता जाधव : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘दार उघड बये’ मालिकेतील शीर्षकगीत ‘वरी कोरडं आभाळ’ या मनाला भिडणाऱ्या खड्या आवाजातील गाण्याला नाशिकच्या अनुजा देवरे हिने स्वरसाज चढविला असून, हे गाणे सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे.

सध्या मनोरंजन क्षेत्रात नाशिककरांचा डंका आहे. नाशिकची गायिका अनुजा देवरे हिने झी मराठी वाहिनीवरील ‘दार उघड बये’ या मालिकेच्या शीर्षकगीताला स्वरसाज चढवून मराठी संगीतसृष्टीत दमदार पदार्पण केले आहे. (Anuja Devere voice to Daar Ughad Baye marathi Serial Title Song Nashik Latest Marathi News)

अनुजाचे शिक्षण आणि गाणे, असा दुहेरी प्रवास सुरू आहे. ती सध्या शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असून, मध्यमा- प्रथम परीक्षेची तयारी करत आहे. के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. टेक. च्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असून, इलेक्ट्रॉनिक ॲन्ड टेलिकम्युनिकेशनची ती विद्यार्थिनी आहे.

आई आणि आजीचा छान आवाज आहे, हीच तिची प्रेरणा आहे. रचना विद्यालयात शिकत असताना दहावीपासून तिने प्रार्थना व गीतमंचामध्ये सहभाग घेतला. शिक्षकांकडून चांगले गाते, अशी मिळालेली शाबासकी प्रेरणादायी ठरलेल्या अनुजाला आंतरशालेय स्पर्धांमधून यश मिळत गेले. तसा तिचा गाण्यातील बारकाव्यांकडील कल वाढत गेला.

मालिकेसाठी गाण्याची तिची पहिलीच वेळ आहे. तिने यापूर्वी जाहिरात पटांसाठी गायले आहे. तुमच्याकडे कला असणे हेच जसे महत्त्वाचे आहे. तसे तुम्ही कलेशी प्रामाणिक असायला हवे, असे यशाचे यमक सांगताना अनुजाशी ‘सकाळ’ ने संवाद साधला.

प्रश्‍न: ’दार उघड बये’ मालिकेच्या शीर्षकगीत गायनासाठी तुझी निवड कशी झाली?

अनुजा : शीर्षक गीताचे संगीतकार विजय कापसे यांची आणि माझी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात ओळख झाली. तिथे आम्ही दोघांनी सादरीकरण केले. एके दिवशी त्यांचा मला फोन आला. अनुजा माझ्याकडे एक प्रोजेक्ट आला आहे. मला तुझ्या खड्या आवाजातील छान गाणं पाठव, असे त्यांनी सांगितले. मी त्यांना एक गायलेलं गाणं पाठवले. हर्ष- विजय या दोन्ही संगीतकारांना ते आवडलं आणि मला गाण्याची संधी मिळाली.

प्रश्‍न: शीर्षकगीत गायनाच्या अनुभवाबद्दल काय सांगशील?

अनुजा : हर्ष- विजय यांनी मला गाण्यातला भाव समजावून सांगितला. गाण्याची पार्श्वभूमी सांगितली आणि पाय थिरकायला लावणारे शीर्षकगीत रेकॉर्ड झाले.

प्रश्‍न: पहिल्या गायनाचे काही दडपण आलं का, भीती वाटली का?

अनुजा : दडपण आणि भीती मला कधीच वाटली नाही. उलटपक्षी मालिकेच्या शीर्षक गायनाची संधी मिळाल्याचा खूप आनंद झाला.माझा गळ्यातून सुंदर गाणं गाऊन घेण्याचे श्रेय हर्ष- विजय यांना जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर भाजप खासदार कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT