Anupam Kher esakal
नाशिक

Anupam Kher in Nasik: "ही तर फक्त सुरवात आणखी 20 वर्षे अभिनयात सक्रिय राहणार", अनुपम खेर यांचा नाशिक मध्ये दावा

रोटरी क्‍लबच्‍या कार्यक्रमात आयोजित मुलाखतीतून त्‍यांनी दिलखुलास संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मोठ्या संस्‍थेकडून नुकताच जीवनगौरव पुरस्‍कारासाठी विचारणा झाली. विनम्रपणे हा पुरस्‍कार स्‍वीकारण्यास मी नकार दिला. आपल्‍या आयुष्यातील अतिउच्च शिखर काय आहे ? हे इतर ठरवू शकत नाहीत. ४० वर्षांमध्ये आजवर ५४० चित्रपट केले आहेत.

परंतु माझ्या दृष्टीने ही सुरवात असून, पुढील वीस वर्षे अभिनय क्षेत्रात सक्रिय राहणार असल्‍याची भावना ज्‍येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी व्‍यक्‍त केली. रोटरी क्‍लबच्‍या कार्यक्रमात आयोजित मुलाखतीतून त्‍यांनी दिलखुलास संवाद साधला. (Anupam Kher statement Will be active in acting for another 20 years Nashik News)

खेर म्‍हणाले, की वडील व आजोबांकडून महत्त्वाचे जीवनमूल्य शिकायला मिळाले. गरीब असल्‍याची हीन भावना आजोबांमुळे संपुष्टात आली. तर वडीलांच्‍या आत्‍मविश्‍वासामुळे अपयशाची भीती नष्ट झाली.

अभ्यासात फारसा रस नसल्‍याने कधी चांगले गुण मिळाले नाही. अभिनयाचे प्रशिक्षण मात्र सुवर्णपदक पटकावीत पूर्ण केले.

'सारांश' चित्रपटातील बी. बी. प्रधानच्‍या भूमिकेसाठी खूप दिवस सराव केलेला असताना ऐनवेळी अन्‍य अभिनेत्‍याला भूमिका दिल्‍याचे समजले. सर्व प्रयत्‍न अपयशी ठरल्‍याने मुंबई सोडून जाणचे निश्‍चित केले. तत्‍पूर्वी भट यांची भेट घेत त्‍यांना सुनावले.

म्‍हणणे पटल्‍यानंतर मलाच भूमिका देण्यावर ते ठाम झाले. तेव्‍हापासून अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. एखादी व्‍यक्‍ती अपयशी होत नाही, तर त्‍या व्‍यक्‍तीच्‍या जीवनातील एखादी घटना, प्रसंगापुरता अपयश मर्यादित असते, असे त्‍यांनी नमूद केले.

...म्‍हणून कश्‍मिर फाईल्‍समध्ये भूमिकेची जबाबदारी वाढली

कश्‍मिरी पंडितांवर झालेल्या घटनेतील सत्‍य ३२ वर्षे दडवून ठेवण्यात आले. पाच लाख लोक विस्‍थापित झालेल्‍या या घटनेवर आधारित कश्‍मिर फाईल्‍स चित्रपट साकारताना खांद्यावर ओझे होते.

चित्रपटातील पात्रास वडील पुष्करनाथ यांचे नाव दिल्‍याने जबाबदारी वाढली होती. वास्‍तवात घडलेल्‍या घटनेच्‍या अवघे दहा टक्‍के या चित्रपटात दाखविण्यात आल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

२६ वर्षांनंतर नाशिकला भेट

यापूर्वी चित्रीकरणासाठी नाशिकला येण्याचा योग आला होता. त्‍यानंतर २६ वर्षांनंतर नाशिकला भेट देत असल्‍याची आठवण अनुपम खेर यांनी नमूद केली.

तेव्‍हाच्‍या तुलनेत शहर मोठे झाले असून, विकास समाधानकारक असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT