Apla Davakhana : ग्रामीण भागाच्या धर्तीवर शहरी भागातील नागरिकांना तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील १०६ आरोग्य केंद्रे अर्थात ‘आपला दवाखाना’ नाशिक महापालिका हद्दीमध्ये उभारले जात आहे.
परंतु यातील बारा आरोग्य उपकेंद्रांची उभारणी मिळकती नावावर नसल्याने अडचणीत आली आहे. (Apla Davakhana in trouble nashik news)
मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतील आपला दवाखाना उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेने १०६ आरोग्य उपकेंद्रांची निश्चित केली आहे. प्रजासत्ताकदिनी चुंचाळे येथे पहिल्या आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर मात्र उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध होत नाही. महापालिकेच्या मिळकती मोठ्या प्रमाणात आहे. यातील १०६ मिळकतींची आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासाठी निवड करण्यात आली.
परंतु यातील जवळपास ९९ टक्के मिळकती या राजकीय नेते व त्यांच्याशी संबंधित असलेल्या संस्था व कार्यकर्त्यांना वापरण्यात देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मात्र आरोग्य उपकेंद्रासाठी नोटीस मिळाल्यानंतर यातील ९४ मिळकती महापालिकेने ताब्यात घेतल्या, तर ३९ मिळकतीमध्ये आरोग्य उपकेंद्र उभारण्यासाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्णत्वास आली आहे.
४५ उपकेंद्रांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. १२ मिळकती या ताब्यात मिळालेल्या नाहीत. त्या मिळकती महापालिकेच्या नावावरच नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
१०६ आरोग्य उपकेंद्रांच्या उभारणीसाठी २२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इमारती उभारण्याबरोबरच अन्य सुविधा या माध्यमातून केल्या जाणार आहेत.
"१०६ आरोग्य उपकेंद्रांच्या जागापैकी ९४ उपकेंद्राच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत १२ जागांवर महापालिकेच्या नावाची नोंद झाली नाही त्यामुळे त्या ताब्यात आलेल्या नाहीत." - लक्ष्मीकांत सातारकर, उपायुक्त, मिळकत विभाग महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.