Gurumauli Annasaheb More while guiding in Swami Samarth Gurupeeth and Servants from all over the country present  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी : गुरुमाउली

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : गाव तेथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि घर तेथे सेवेकरी हे अभियान राबविण्यासाठी सर्व सेवेकऱ्यांनी सक्रिय व्हावे.

समर्थ कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडवायचे असेल तर प्रत्येक घरात स्वामीसेवा पोचणे गरजेचे आहे म्हणूनच असं निर्व्यसनी, आदर्श, सुसंस्कृत, सशक्त कुटुंब, समाज, राष्ट्र उभे करण्यासाठी आपण सर्वांनी आजपासूनच कामाला लागावे’, असे आवाहन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केलं. या प्रसंगी चंद्रकांतदादा, नितीनभाऊ, आबासाहेब मोरे, व्यवहारेसर आदी मान्यवर उपस्थित होते. (Appeal by Gurumauli Annasaheb More about campaign of Sri Swami Samarth Seva Kendra and ghar tithe sevekari nashik news)

महिन्याच्या चौथ्या शनिवारी त्र्यंबकेश्वर येथील श्री.स्वामी समर्थ गुरुपीठात देशभरातील प्रमुख सेवेकऱ्यांची महासभा होत असते. गेल्या महिन्यात देशभरात झालेल्या कामाचा आढावा आणि पुढील महिन्यातील नियोजन यासाठी ही सेवामार्गाची महासभा १९९२ पासून नियमितपणे होत असते. महासभा आणि गुरुपौर्णिमा उत्सवाचा प्रारंभ, या निमित्ताने गुरुपीठात एकत्रित झालेल्या नऊ हजार सेवेकऱ्यांशी हितगूज साधताना गुरुमाउलींनी वरील आवाहन केले.

३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे परंतू सेवामार्गाचा वाढता व्याप लक्षात घेता एकाच दिवशी देशभरातील महिला पुरुष सेवेकऱ्यांची त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी येथे गर्दी होऊन नियोजनाचा ताण यायला नको म्हणून आजपासून ३ जुलैपर्यंत जिल्हावार विभागणी करून रोज ठराविक संख्येने सेवेकरी दिंडोरी, त्र्यंबकमध्ये येथील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.

आजपासून गुरुपौर्णिमा उत्सव सुरू करण्यात आला आणि गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, नृसिंहवाडीसह देश आणि विदेशातील समर्थ केंद्रावर होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाचे नियोजन करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जून महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्यानं चिंता व्यक्त करून गुरुमाउली म्हणाले सेवेकरी पर्जन्य सुक्ताच्या माध्यमातून पर्जन्य राजास विनंती करतच आहेत पण आता गावागावात ग्रामस्थांनी मंदिरात एकत्र येऊन साकडे घालावे तरच पर्जन्यराजा प्रसन्न होईल.

आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, भाविक वारीतून आज विठ्ठल, पांडुरंग दर्शनासाठी पंढरीत हजर होत आहेत. वारीत जाण्याचं पुण्य, अनुभूती मोठीच आहे. पण पांडुरंगाबरोबरच पुंडलिकालाही समजून घ्यायला हवे, असा मोलाचा सल्लाही गुरुमाउली यांनी दिला.

अब्जचंडी व इतर आध्यात्मिक सेवांबरोबरच एक कोटी वृक्षारोपण, स्वच्छता आरोग्य अभियान, मराठी अस्मिता भारतीय संस्कृती, गर्भ, मूल्य, बाल, युवासंस्कार, सामुदायिक विवाह, सेंद्रिय शेती, ग्रामअभियान, प्रश्नोत्तर अशा विविध समजपयोगी कामांचा आढावा घेऊन मार्गदर्शन गुरुमाउलींनी केले.

आजच्या या महासभा व गुरुपौर्णिमा शुभारंभप्रसंगी नेपाळसह इतर देशांमधून जवळपास सहाशे महिला पुरुष सेवेकरी उपस्थित होते. सर्वांनी मधल्या सुट्टीत पालखी सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षिस; कोण आहे अनमोल बिश्नोई?

Diwali 2024: दिवाळीत घराची स्वच्छता करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, काम होईल सोपे

Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

NCP Jalgaon Vidhansabha 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देवकर, खोडपे, खडसेंना उमेदवारी!

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT