admission esakal
नाशिक

नाशिक : पदविका अभ्यासक्रमांच्‍या अर्जाची उद्यापर्यंत मुदत

अरूण मलाणी

नाशिक : इयत्ता बारावीनंतरच्‍या (HSC) पदविका (Diploma) अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. औषधनिर्माणशास्‍त्र (Pharmacology), सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी (Surface coating technology) तसेच हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी (Hotel Management and Catering Technology) या शिक्षणक्रमांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी शुक्रवार (ता.८) पर्यंत मुदत असेल. (Application deadline for diploma courses till tomorrow Nashik News)

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेशासाठीची प्रक्रिया राबविली जात आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता बारावीनंतरच्‍या पदविका अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी ही प्रक्रिया आहे. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे, तसेच आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी शुक्रवार (ता.८) पर्यंत मुदत दिलेली आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना इ.-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. गुणवत्ता यादीची प्रक्रिया पूर्ण केल्‍यानंतर कॅप राउंडचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशासाठी चुरस बघायला मिळणार आहे.

१५ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी

सध्याच्‍या वेळापत्रकानुसार प्रारूप गुणवत्ता यादी ११ जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना हरकती, तक्रारी नोंदविण्यासाठी १२ ते १४ जुलै या कालावधीत मुदत उपलब्‍ध करून दिली जाईल. या प्रक्रियेनंतर १५ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT