startup award esakal
नाशिक

National Startup Awards : राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारासाठी अर्जाची 31 मेपर्यंत अंतिम मुदत

सकाळ वृत्तसेवा

National Startup Awards : राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२३ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १ एप्रिलपासून सुरू झाली असून, ३१ मेपर्यंत अंतिम मुदत राहील. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये २० श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात येतील. (Application deadline for National Startup Awards is 31 May nashik news)

ज्या श्रेणींचा सध्याच्या भारतीय आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा केल्यानंतर विचार करण्यात आला आहे त्यामध्ये एरोस्पेस, किरकोळ आणि परिवर्तनकारक तंत्रज्ञानापासून अधिक प्रभाव निर्माण करण्यावर भर असलेल्या श्रेणींपर्यंत विविध श्रेणींचा समावेश आहे. प्रत्येक श्रेणीतील विजेत्या स्टार्टअप्सला उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातर्फे (डीपीआयआयटी) दहा लाख रुपयांच्या रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येईल.

नवोन्मेषी उत्पादने तयार करणाऱ्या आणि लक्षणीय सामाजिक प्रभावाचे दर्शन घडविणारे उल्लेखनीय स्टार्टॲप्स आणि स्टार्टॲप्स व्यवस्थेला पूरक वातावरण निर्माण करणाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी २०२० मध्ये राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार सुरू केले.

आतापर्यंत पुरस्कार वितरणाच्या तीन कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप व्यवस्थेच्या विकासात क्रांती घडविण्यात मोलाचे योगदान देणारे स्टार्टॲप्स आणि पूरक वातावरण निर्माण करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

विविध क्षेत्रातील स्टार्टॲप्सना मान्यता देण्याचा आणि सन्मानित करण्याचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी डीपीआयआयटीने राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा प्रारंभ केला. ‘व्हिजन इंडिया @ २०४७’ या दृष्टिकोनाला अनुसरून देशातील नवोन्मेषांचा सन्मान करण्यात येईल. ज्यामध्ये भारत विविध संकल्पनांमधील अमृत काळाच्या भावनेने प्रेरित होऊन विकसित अर्थव्यवस्था बनण्यावर भर देत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार २०२३ मधील विजेत्यांना आणि अंतिम फेरी गाठणाऱ्यांना गुंतवणूकदार आणि सरकारसोबत संपर्क, मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची उपलब्धता, कॉर्पोरेट आणि युनिकॉर्नसोबत संपर्क आणि इतर प्रकारच्या मदतीसह संपूर्ण पाठबळ दिले जाणार आहे. यापूर्वीच्या तीन राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार सोहळ्यात सहा हजार ४०० स्टार्टॲप्स सहभागी झाले होते. साडेचारशेहून अधिक स्टार्टअप्सना विजेते आणि अंतिम फेरीतले प्रवेशकर्ते म्हणून मान्यता मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT