Appointment of 7 members on District Planning Committee nashik  esakal
नाशिक

Nashik News : जिल्हा नियोजन समितीवर 7 सदस्यांची नियुक्ती; राष्ट्रवादी अजित पवार गटाचा वरचष्मा

जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून सात जणांची नियुक्ती झाली आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा वरचष्मा राहिल्याचे दिसून येते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून सात जणांची नियुक्ती झाली आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा वरचष्मा राहिल्याचे दिसून येते.

जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त करावयाच्या २० राजकीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती रखडली आहे.(Appointment of 7 members on District Planning Committee nashik news)

याकरिता जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिवांनी २० नावे राज्य सरकारकडे पाठवली आहेत. पण त्याला अद्यापही मुहूर्त लागलेला नव्हता. परंतु २० पैकी ७ सदस्यांची नियुक्तीचे आदेश शासनाने काढले असून जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे गटाचे असताना विशेष निमंत्रित सदस्य निवडीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचेच वर्चस्व दिसून आले आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असताना पालकमंत्रीपद दादा भुसे यांच्याकडे आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या मर्जीतील सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. अर्थात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार आहे. त्यामुळे त्यांना अधिक सदस्य मिळणे निश्चित होते.

यांची झाली नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) रवींद्र पगार, रंजन ठाकरे, प्रेरणा बलकवडे, राजेंद्र भामरे, बाळासाहेब म्हस्के, केरू दादा खतेले, सुरेश अंबादास खोडे या सदस्यांच्या नियुक्तीचा आदेश उपसचिव नितीन खेडकर यांनी काढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT