Nashik News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी अल्मोंड्स सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन महिन्यात सदर संस्थेने अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Appointment of Almonds organization for Namami Goda project Nashik News)
गोदावरी व उपनद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी गंगा नदीच्या धर्तीवर नमामि गोदा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने महापालिकेला १८२३ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली.
त्यासाठी महापालिकेला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अल्मोंड्स नांगिया सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली. संस्थेने प्रकल्पाचा प्रारूप आराखडा तयार केला.
यामध्ये २७८० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली. प्रकल्प अहवाल तयार करताना भागधारकांचा सहभागदेखील महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शहरातील आर्किटेक्ट, डॉक्टर, बिल्डर्स, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, समाजसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, फेरीवाले यांचेही मत प्रकल्प अहवाल तयार करताना घेतले जाणार आहे.
त्या संदर्भात सल्लागार संस्थेला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.