Nashik News : बहुप्रतिक्षित पोलिसपाटील पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, १९३ गावांना जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात पोलिसपाटील मिळणार आहेत. तसेच ७४ कोतवालांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत.
जिल्ह्यात पोलिसपाटलांची रिक्त असलेली ६६६ पदे भरली जाणार होती. (Appointments of 74 Kotwals in district from 1st January nashik news)
परंतु आदिवासी व बिगरआदिवासी क्षेत्र तसेच विविध प्रवर्गांच्या आरक्षणाच्या अडचणीमुळे अखेर बिगरपेसा क्षेत्रातील १९३ पदे भरण्याचीच परवानगी मिळाली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने १० डिसेंबरला प्रवेश परीक्षा घेतली. प्रांताधिकाऱ्यांना त्या-त्या उपविभागांतील पदे भरण्याचे आदेश दिले. २७ डिसेंबरपर्यंत त्यांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यातच नियुक्तीचेही आदेश दिले होते.
त्यानुसार आता संबंधित प्रांताधिकाऱ्यांकडून नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. जानेवारीत सर्वच १९३ गावांमध्ये पोलिसपाटील कार्यरत होतील, असे महसूल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, उर्वरित ४७३ पदांसाठी न्यायालय आणि शासनाच्या आदेशानंतर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून आदेश प्राप्त होताच ही पदेही भरली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, पोलिसपाटील पदांप्रमाणेच कोतवालांचीही बिगरपेसा क्षेत्रातीलच पदे भरण्यास शासनाकडून अनुमती मिळाली होती. त्यानुसार एकूण १४६ पदांपैकी बिगर पेसातील ७४ पदे भरण्यात आली आहेत. पेसामधील ७२ पदे ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच भरली जातील.
आता या सर्व कोतवालांना संबंधित तहसीलदारांकडून नियुक्ती आदेश देण्याचे प्रक्रिया सुरू आहे. जानेवारीत हे सर्व कोतवाल आता आपापल्या नियुक्तीच्या तलाठी सजेवर रुजू होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान कोतवाल पदांसाठी कुठलीही मुलाखतींची प्रक्रिया नसल्याने ऑनलाइन परीक्षा घेतल्यानंतर त्याच दिवशी निकालही जाहीर करत निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.