Pharmacy Education : नवी दिल्लीच्या फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या मान्यतेच्या आधारे राज्यातील ६ संस्थांना औषध निर्माणशास्त्राच्या ६०० जागा २०२३-२४ पासून कायम विनाअनुदान तत्वावर सुरु करण्यासाठी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी (ता. १९) मान्यता दिली. (Approval of 600 seats of pharmacy on unaided basis in the state nashik news)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यात बी. फार्मसीच्या ३६० आणि डी. फार्मसीच्या २४० जागांचा समावेश आहे. अंजनेरीच्या (ता. त्र्यंबकेश्वर) ब्रह्मा व्हॅली इन्सिट्यूट ऑफ फार्मसीत बी. फार्मसीच्या ६० जागा समाविष्ट आहेत. याशिवाय बोरकुंड (ता. धुळे) येथील इंदुभाई भदाणे प्रतिष्ठानच्या फार्मसी महाविद्यालयात बी. फार्मसी आणि डी. फार्मसीच्या प्रत्येकी ६० जागा कायम विनाअनुदानित तत्वावरील आहेत.
कायम विनाअनुदान तत्वावर बी. फार्मसी आणि डी. फार्मसीच्या प्रत्येकी ६० जागांना मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांची नावे अशी : नागपूरचे गायकवाड पाटील, नगरची विश्वभारती अकादमी, पुण्याचे सूर्यदत्ता, परभणीत श्रीराम प्रतिष्ठानच्या आदित्य संस्थेच्या बी. फार्मसीच्या ६० जागांनाही मान्यता मिळाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.