dr. subhash bhamare esakal
नाशिक

Nashik News: हरणबारी उजव्या कालव्यासह केळझर चारी (८) ला मंजुरी; डॉ. भामरे यांची माहिती

हरणबारी डाव्या कालव्याचे काम टेंडर होऊन प्रत्यक्षात आज सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील हा पहिला बंदिस्त कालवा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: गेल्या २५ ते ३० वर्षापासून प्रलंबित तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा व वाढीव केळझर चारी क्रमांक ८ या अत्यंत महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांना महाराष्ट्र राज्य नियामक मंडळाने मंजुरी दिल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे दिली. (Approval of Kelzar Chari (8) with Haranbari Right Canal nashik news)

डॉ. म्हणाले, तालुक्यातील सहा सिंचन प्रकल्प गेल्या २५ ते ३० वर्षापासून प्रलंबित होते. त्यासाठी प्रत्येक सिंचन प्रकल्पनिहाय काम केले. तळवाडे-भामरे पोहोच कालवा, केळझर डावा कालवा व चारी क्रमांक ८ चे काम पूर्ण होऊन पाण्याची यशस्वी चाचणी झाली. हरणबारी डाव्या कालव्याचे काम टेंडर होऊन प्रत्यक्षात आज सुरू झाले आहे.

महाराष्ट्रातील हा पहिला बंदिस्त कालवा आहे. हरणबारी उजवा कालवा व केळझर वाढीव चारी क्रमांक ८ चा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा यासाठी गेल्या आठवड्यात जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोन्ही कालव्यांची उपयोगितेबाबत चर्चा करून बागलाण तालुक्यातील ३०-४० गावांचा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न कसा मार्गी लागले हे पटवून दिले.

उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी दखल घेत अर्थ व नियोजन मंडळाच्या अधिकारींना हे कालवे मंजूर करण्याचा सूचना दिल्या. त्या अनुषंगाने नियामक मंडळाची बैठक झाली. त्यात मंजुरी देण्यात आली. हे दोन्ही कालवे भूमिगत असतील. लवकरच निधी वर्ग होऊन या कालव्यांचे टेंडर होतील असा विश्वासही खासदार भामरे यांनी व्यक्त केला.

या गावांना होणार फायदा

हरणबारी उजव्या कालव्यामुळे जामोटी, दगडपाडा, मुल्हेर, मुंगसे, पिंगळवाडे, करंजाड, भुयाने, ताहाराबाद, पारनेर बिजोटे, निताने, आखतवाडे, गोराणे, फोफिर, कोटबेल, खिरमानी, नळकस, कुपखेडा, सारदे, वायगाव, जुने रातीर, रामतीर, देवळाने, सुराने, सातमाने.

केळझर वाढीव चारी क्रमांक ८ मुळे चौगाव, कर्हे, अजमेर सौंदाणे, देवळाणे, सुराणे, वायगाव या गावांना सिंचनासाठी फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT