Apurva Asmar with his family esakal
नाशिक

Nashik : अपुर्व अस्मरचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डंका

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : सहकार (Cooperation), शैक्षणिक (Education), राजकीय (Politics), धार्मिक (Religious) व न्याय (Justice) क्षेत्रात दबदबा असलेल्या शहरातील अस्मर कुटुंबातील अपूर्व धनंजय अस्मर या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC Exam) शहराचा डंका वाजविला आहे. सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपूर्व चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला. ९ मेस झालेल्या तोंडी परीक्षेतही त्याने यशस्वीरित्या बाजी मारली. अपूर्वने देशपातळीवर (AIR) ५५८ वा रँक मिळविला आहे. त्याच्या यशाबद्दल शहरात सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे. (Apurva Asmar success in UPSC Nashik Success Story News)

शहर व परिसरातील पंधरापेक्षा अधिक तरुणांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आजवर यश मिळवून मालेगावच्या नावलौकिकात भर घातली आहे. अभ्यासातील सातत्य, झालेल्या चुका शोधून त्यावर उपाय करणे, कुटुंबियांचा विश्‍वास व अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कोणतेही परिश्रम घेण्याची तयारी यामुळे हे यश मिळाल्याचे अपूर्व अस्मर यांनी ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले. अपूर्वचे वडील धनंजय व्यावसायिक आहेत. आई शुभांगी अस्मर या काकाणी विद्यालयात शिक्षिका आहेत.

Apurva Asmar

अपूर्वचे प्राथमिक शिक्षण येथील वर्धमान प्राथमिक शाळेत झाले. काकाणी विद्यालयात माध्यमिक शिक्षण पार पडले. दहावीनंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी अपूर्वने पुणे गाठले. एस. पी. कॉलेज मधून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणेमधून त्याने संगणक अभियंता पदवी मिळवली. पदवी मिळवताच अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यासाला सुरुवात केली. यापुर्वी झालेल्या तीन परीक्षेत कधी प्रिलीम तर कधी मेन अथवा तोंडी परीक्षेत त्याला यशाने हुलकावणी दिली. या कालावधीत एक वर्षासाठी अपूर्वने युनिक ॲकेडमी पुणे येथे क्लास लावला. प्रामुख्याने मित्रांसमवेत अभ्यास करत गटचर्चा, स्वयं अध्ययन, नियमित अभ्यासातून स्वत:च्या चुका शोधत आपल्याला सोयीच्या होईल या पध्दतीने अभ्यास करीत हे यश संपादन केले. कुटुंबाचे यासाठी पाठबळ लाभले. कुटुंबियांनी कधीही जॉबसाठी फोर्स केला नाही. तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या स्वप्नांची पुर्ती कर असे सांगितल्याने यशाला हातभार लागला. या यशाचा आनंद अवर्णनीय आहे.

"राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करताना जिद्द, चिकाटी, परिश्रम घेण्याची तयारी महत्वाची असते. यशाने हुलकावणी दिल्यानंतर हिंमत नाही सोडली पाहिजे. ज्याची आवड आहे त्याच क्षेत्राची निवड करावी. आपल्याला सोयीचा होईल असा अभ्यास तरुणांनी करावा. अभ्यास करताना स्वत:च्या चुका शोधाव्यात. व त्यावर उपाययोजना करावी. मी याच पध्दतीने मार्गक्रमण केले. घरच्यांनी विश्‍वास ठेवला. जॉबसाठी फोर्स केला नाही. यामुळे सारे काही सुखकर झाले."

- अपूर्व अस्मर, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT