Actress Ketaki Mategaonkar, Dr. Ashok Karanjkar, MLA Prof. Devyani Farande, MLA Seema Hire and officials. esakal
नाशिक

NMC Flower Festival : नाशिकमध्ये दरवळला पुष्पोत्सवाचा सुगंध! 2 दिवस निसर्गाची मेजवानी

महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे नाशिककरांना तीनदिवसीय पुष्पोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC Flower Festival : महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे नाशिककरांना तीनदिवसीय पुष्पोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे. अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या हस्ते पुष्पोत्सव प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले.

नाशिक शहर फुल असते, तर मी नाशिकला मोगऱ्याची उपमा दिली असती, या शब्दांत तिने नाशिकबद्दल प्रेम व्यक्त केले. (aroma of nmc flower festival in Nashik for 2 days feast of nature nashik news)

महापालिका मुख्यालयात ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान होत असलेल्या पुष्पोत्सव कार्यक्रमाच्या उद्‌घाटनाला आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर अध्यक्षस्थानी होते. नाशिककरांशी संवाद साधताना केतकी माटेगावकर हिने नाशिक खूपच सुंदर असल्याचे सांगितले.

नाशिककरांमध्ये प्रेम- जिव्हाळा आहे. अंकुश चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने मला नाशिकमध्ये महिनाभर राहण्याची संधी मिळाली. या वेळी मी नाशिकरांचे प्रेम अनुभवल्याचे सांगितले. आर.जे. प्रथम याने केतकीला विचारलेल्या प्रश्नांना तिने दिलखुलास उत्तरे दिली. केतकीने तिच्या अल्बममधील ‘भास हा नवा-नवा’ व ‘टाइमपास’ चित्रपटातील ‘मला वेड लागले प्रेमाचे’ हे गीत सादर केले.

आमदार ढिकले म्हणाले, की पुष्पोत्सवामुळे नाशिककरांना पर्यावरण संवर्धनाचे व वृक्ष लागवडीचे प्रोत्साहन मिळाले. उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी उद्यान विभागाने कामकाजाला दिशा दिल्याचे गौरवोद्‌गार काढले. आमदार प्रा. फरांदे यांनी आयुष्यात झाडे, फुले, फळे यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले.

प्रारंभी पुष्पदिंडी काढून उत्सवाची सुरवात करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद राजगुरू व योगेश कमोद यांनी सूत्रसंचालन केले. नाना साळवे यांनी आभार मानले. कार्यकारी अभियंता रवी बागूल यांनी गीते सादर केली. दहा व अकरा फेब्रुवारी या दोन दिवशी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत पुष्पप्रदर्शन नाशिककरांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

पुष्पप्रदर्शनात फुलांची आकर्षक कमान, सेल्फी पॉइंट, मिनीचर, लँडस्केपिंग, महापालिका मुख्यालयातील तिन्ही मजल्यांवर विविध फुलांच्या गटांची पुष्परचना, गुलाबपुष्पे, मोसमी फुले व फळे, भाजीपाला, हार, बुके आहेत. ट्रॅक्टस, शोभिवंत कुंड्या, नर्सरी व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ठेवण्यात आले आहेत.

पुष्पोत्सवाच्या निमित्ताने उद्‌घाटन सत्रानंतर स्वर संगीत कार्यक्रम झाला. शनिवारी (ता. १०) सकाळच्या सत्रात निसर्ग व फुलांवर आधारित कविता सत्र, सायंकाळी संगीत संध्या; तर रविवारी (ता. ११) सिने अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे.

आरुष काळे गुलाबाचे मानकरी

गुलाब राजाची मानाची ट्रॉफी आरुष काळे यांना, तर गुलाब राणीची ट्रॉफी माधुरी धात्रक यांनी पटकावली. परिसर प्रतिकृतीत नाशिक पूर्व विभागाने प्रथम क्रमांक पटकावला. सर्वोत्कृष्ट तबक उद्यान- ज्योती पाटील, सर्वोत्तम परिसर प्रतिकृती- प्रसाद नर्सरी, पुष्प रांगोळी- पंकजा जोशी, जपानी पुष्परचना (इकेबना)- स्वप्नाली जडे, सर्वोत्तम बोन्साय- विनायक शिंदे, सर्वोत्तम कुंड्यांची शोभिवंत नर्सरी- प्रसाद नर्सरी, उत्कृष्ट नर्सरी- पपया नर्सरी यांना पारितोषिके देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT