Red onion prices News esakal
नाशिक

Nashik News : येवल्यात लाल कांद्याच्या आवकला सुरवात; बाजारभाव स्थिर

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : सप्ताहात येवला बाजार समिती मुख्य आवारासह अंदरसूल उपबाजार आवारावर लाल कांदा आवक सुरुवात झाली असली तरी अद्यापही लाल कांद्याचे बाजारभाव स्थिर आहे. (Arrival of red onion started in Yeola Market price stable Nashik News)

कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, ओरिसा, दिल्ली, पंजाब, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आदी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात कांद्याची एकूण आवक २४ हजार १६५ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २०० ते कमाल १ हजार ९७६ रुपये तर सरासरी १ हजार ४५० प्रति क्विंटलपर्यंत होते. तर लाल कांद्याचे बाजारभाव ५०० ते १ हजार ९२५ तर सरासरी १ हजार ४५० रुपये होते.

उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची आवक ५ हजार ८५६ क्विंटल झाली तर उन्हाळ कांद्याला सरासरी १ हजार ४०० तर लाल कांद्याला सरासरी १ हजार ५०० रुपयापर्यंत दर होते.

सप्ताहात मकाच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. मक्यास व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. बाजारात मक्याची आवक ४२ हजार ४०८ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १ हजार ९५५ ते कमाल २ हजार २१२ रुपये तर सरासरी २ हजार १३० प्रति क्विंटलपर्यंत होते.

अंदरसुल उपबाजारातही मका, सोयाबीन व भुसार धान्य लिलाव सुरू असून शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी केले आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

गहू, बाजरी, सोयाबीन, हरभरात घट

गव्हाच्या आवकेत घट झाली असली तरी गव्हास स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी होती. गव्हाची आवक ३३ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान २ हजार ३११ ते कमाल २ हजार ९०० रुपये तर सरासरी २ हजार ७५१ पर्यंत होते. बाजरीच्या आवकेत घट होऊन आवक २४ क्विंटल इतकी झाली. बाजरीस बाजारभाव किमान १ हजार ९०० ते कमाल २ हजार ८०० रुपये तर सरासरी २ हजार ११९ रुपयांपर्यंत होते. सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले.

हरभऱ्यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. आवक ८६ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ३ हजार ४०० ते कमाल ५ हजार ४११ रुपये तर सरासरी ४ हजार २०० पर्यंत होते. सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत घट झाली तर स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सोयाबीनची आवक २६१ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ४ हजार ३०१ रुपये ते कमाल ५ हजार ५४० रुपये तर सरासरी ५ हजार ३८० पर्यंत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT