yoga  esakal
नाशिक

समाजमन : टप्प्यांनुसार समजून घ्या योगाभ्यास!

Latest Marathi Article : योगशास्त्र ही अमूल्य देणगी जगाला भारताने दिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर नुकताच साजरा करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. नितीन ठाकरे

योगशास्त्र ही अमूल्य देणगी जगाला भारताने दिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर नुकताच साजरा करण्यात आला. मात्र, योगाभ्यास करणाऱ्यांना फक्त योगासने, प्राणायाम व ध्यान म्हणजे योगाभ्यास असे वाटते. याच गैरसमजुतीमुळे अनेकदा ते चुकीच्या टप्प्यांवर चुकीच्या पद्धतीने अवलंबिली जातात आणि विनाकारण आपत्तींना आमंत्रण मिळते. प्रत्येक साधकाने जीवनाची योग्य दिशा दाखविणाऱ्या योगाच्या सर्वांगाचा टप्प्याटप्प्याने अभ्यास केला तर योगाभ्यासातून अपेक्षित व्याधीरहित जीवन आपल्याला जगता येईल. (article by author adv nitin thackeray on Understand yoga practice step by step)

आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्व जगभरासह भारतात तीन दिवसांपूर्वीच अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. योगशास्त्राला देशासह जगाच्या पटलावर खऱ्या अर्थाने ओळख आपल्या देशात मिळाली आहे. योगसाधनेचे महत्त्व आता जगालाही पटलेले आहे. क्वचितच असा देश असेल, की तेथे योगाबद्दल माहिती नाही. योगशास्त्र ही अमूल्य देणगी जगाला भारताने दिली आहे.

मन-शरीराचा परिपूर्ण संवाद

योग ही निरोगी जगण्याची एक कला आणि विज्ञान आहे. ‘योग’ हा शब्द संस्कृत मूळ ‘यूज’पासून आला आहे. ज्याचा अर्थ ‘जोडणे’ किंवा ‘एकत्रित होणे’ असा होतो. योगशास्त्रानुसार योगाच्या अभ्यासामुळे मन आणि शरीर, मनुष्य आणि निसर्ग यांच्यात परिपूर्ण सुसंवाद निर्माण होतो. मोक्ष किंवा स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या सर्व प्रकारच्या दुःखांवर मात करणे म्हणजे आत्मसाक्षात्कार हे योगाचे उद्दिष्ट आहे. मूलभूत मानवी मूल्ये ही योगसाधनेची ओळख आहे. अतिप्राचीन लोकपरंपरेत, सिंधू संस्कृती, वैदिक आणि उपनिषदिक वारसा, बौद्ध आणि जैन परंपरा, दर्शने, महाभारत आणि रामायण, वैष्णव आणि तांत्रिक परंपरांमध्ये योगाची उपस्थिती दर्शविते.

योगाचे अस्तित्व कुठपर्यंत?

योगाच्या अस्तित्वाचे ऐतिहासिक संदर्भ वेदपूर्व काळात आणि त्यानंतर पतंजलीच्या काळापर्यंत पाहिले गेले. या काळातील योगसाधना आणि त्यासंबंधीचे साहित्य ज्यातून आपल्याला माहिती मिळते, ते मुख्य स्रोत वेद, उपनिषद, स्मृती, बौद्ध धर्माची शिकवण, जैन धर्म, पाणिनी, महाकाव्ये व पुराणांमध्ये उपलब्ध आहेत. आपल्याला भगवद्‍गीतेत आढळते ज्याने ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या संकल्पना विस्तृतपणे मांडल्या आहेत. हे तिन्ही प्रकारचे योग आजही मानवी बुद्धीचे सर्वोच्च उदाहरण आहेत. आजही गीतेत दाखविलेल्या पद्धतींचा अवलंब करून लोकांना शांती मिळते. पतंजलीच्या योगसूत्रात योगाच्या विविध पैलूंचा समावेश आहे.

योगाचे ध्येय अधिक दूरगामी

योगामुळे शरीर उच्च पातळीवरील ऊर्जा टिकवून ठेवू शकते. याची प्रक्रिया शरीरापासून सुरू होते. नंतर श्वास, मन आणि अंतर्मन, आरोग्य आणि फिटनेससाठी एक थेरपी किंवा व्यायाम प्रणाली म्हणूनही समजले जाते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे योगाचे नैसर्गिक परिणाम असले, तरी योगाचे ध्येय अधिक दूरगामी आहे. योग म्हणजे स्वतः विश्वाशी सुसंवाद साधणे.

योगासने ही केवळ पूर्वतयारी

योगशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र असून, योग म्हणजे जीव व ईश्वर यांचा संयोग असे पतंजली ऋषींनी योगशास्त्र सूत्ररूपाने मांडले आहे. यात योगाची व्याख्या सर्वसाधारण तरंग नसलेल्या एखाद्या शांत सरोवराप्रमाणे मन निर्विकार करणे म्हणजे योग. आपल्या मनात जागेपणी व झोपेतही सतत तरंग उठत असतात. मन सतत हिंडत-फिरत असते. मन निर्विकार करण्यासाठी पतंजलीने अनेक पायऱ्या व साधने सांगितली आहेत, म्हणूनच योगशास्त्र मुख्यतः मानसिक आहे, शारीरिक नाही. म्हणून योग म्हणजे केवळ योगासने नाहीत. योगासने ही केवळ एक पूर्वतयारी आहे. शरीर हट्टाने काबूत आणणे, त्यानंतर मन काबूत आणणे, याला हठयोग म्हणता येईल. योगशास्त्रात आठ अंगे-पायऱ्या आहेत, म्हणून त्याला अष्टांगयोगही म्हणतात.

योगशास्त्र मुख्यत्वे मानसिक

भारतात सुरू झालेली योगपरंपरा आता जगात अनेक देशांमध्ये पोहोचली आहे. पण, सध्या त्यातला शारीरिक भागच जास्त पसरला. योगशास्त्र शिकविणाऱ्या हजारो शाखा व प्रशिक्षकांकडून वेगवेगळा योग शिकविला जातो. प्रकार काही असले, तरी योगशास्त्र मुख्यत: मानसिक आहे. केवळ शारीरिक नाही, हे लक्षात असावे. योग म्हणजे व्यायाम नाही. योगशास्त्राचा उद्देश शरीर आणि मन शद्ध व भक्कम करणे हा आहे. व्यायाम आणि योगातला फरक आपण नंतर पाहणारच आहोत. (latest marathi news)

अष्टांगयोग आणि उपांगे

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी ही योगाची आठ उपांगे आहेत. अष्टांग योग मुख्यत्वे दोन विभागांत आहे. बहिरंग योग ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम येतात आणि अंतरंग योग ज्यात ध्यान, धारणा, समाधी येतात. पाचवे अंग म्हणजे प्रत्याहार जो बहिरंग योगाला व अंतरंग योगाला जोडणारा सेतू आहे. माणसाचे स्थूल शरीर व सूक्ष्म मन यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. म्हणूनच त्यांचा एकत्रितपणे विचार करून शरीरसंवर्धनासाठी आणि मनशुद्धीसाठी, मनोकायिक आरोग्य लाभावे म्हणून ही यम, नियम आदी साधने सांगितली आहेत.

लयबद्ध श्वसनाला विशेष महत्त्व

लयबद्ध श्वसनाला योगात अतिशय महत्त्व आहे. प्राणायाम हे योगोपचारातले एक प्रमुख साधन आहे. प्राणायामाच्या अचूक व नियमित सरावामुळे फुफ्फुसांची श्वसनक्षमता वाढते आणि म्हणूनच साधकाचे आयुष्य वाढते. साधकाला निरोगी शरीर, स्थिर व प्रसन्न चित्त, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अचूक निर्णयक्षमता प्राप्त होते.

ध्यानाचे अनन्यसाधारण महत्त्व

प्रत्याहार म्हणजे मन आणि इंद्रिये यांच्यावर ताबा मिळविण्याची शिस्त. प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे इंद्रियांना शांत ठेवणे शक्य होते; तर एखाद्या बिंदूवर, विषयावर एकाग्रता साधण्याची कला म्हणजे धारणा. यामुळे आंतरिक जागरूकता निर्माण होते व मनात सतत उद्‍भवणाऱ्या विचारांचे संकलन होऊन मानसिक ताणतणाव दूर होतात. धारणा दीर्घकाळ टिकून राहिली, की मगच ध्यान लागते. साधकाच्या संपूर्ण मनोकायिक रचनेत सुयोग्य बदल घडवून आणण्याची शक्ती असते म्हणूनच ध्यानाला अतिशय महत्त्व आहे. उन्नतीसाठीच धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन साधने आहेत.

...तरच व्याधिरहित जीवन शक्य

आरोग्यप्राप्तीसाठी योगाभ्यास करणाऱ्या तुम्हा-आम्हासारख्यांना फक्त योगासने, प्राणायाम व ध्यान म्हणजे योगाभ्यास असे वाटते. याच गैरसमजुतीमुळे अनेकदा ते चुकीच्या टप्प्यांवर चुकीच्या पद्धतीने अवलंबिली जातात आणि विनाकारण आपत्तींना आमंत्रण मिळते. प्रत्येक साधकाने जीवनाची योग्य दिशा दाखविणाऱ्या योगाच्या सर्वांगाचा टप्प्याटप्प्याने अभ्यास केला तर योगाभ्यासातून अपेक्षित व्याधीरहित जीवन आपल्याला जगता येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT