नाशिक : येथील कालिदास कलामंदिरात (Kalidas Kalamandir) स्थानिक कलावंतांच्या ‘पाऊसपाड्या’ आणि ‘बट बिफोर लिव्ह’ या दोन एकांकिकाचे शनिवारी (ता. २६) सादरीकरण झाले. यावेळी मोठया संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. मात्र थिएटर व्यवस्थापनाने पुरविलेल्या तंत्रज्ञानातील दोषांमुळे सादरीकरण करणारे कलावंत (Theater Artists) व प्रेक्षक (Audience) दोन्हींना मनस्ताप सहन करावा लागला.
कलाकार अन् प्रेक्षकांचा हिरमोड
विविध स्पर्धांमधून अनेक पारितोषिके पटकावलेल्या नाशिकच्या स्थानिक कलावंतांच्या दोन एकांकिकांचे प्रयोग कालिदास कलामंदिरात सादर झाले. मात्र यावेळी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे अनेक तांत्रिक अडचणींचा सामना कलावंतांना करावा लागला. ऐन नाटकाच्या वेळेत लाईट जाणे, ध्वनीयंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्याने प्रेक्षकांपर्यंत संवाद पोचत नव्हते. त्यामुळे प्रेक्षकांचाही हिरमोड झाला. एव्हढेच नव्हे तर प्रसाधनगृहात पाण्याची दुर्भिक्ष पाहायला मिळली. जर स्थानिक कलाकारच अशा व्यवस्थापनाने त्रस्थ होत असतील तर बाहेरून येणाऱ्यांच काय, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. प्रयोग लावण्यासाठी पैसे आकारतात तशा सुविधाही मिळायला हव्यात असा सुर यावेळी कलाकार आणि प्रेक्षकांमधून ऐकू आला.
''आम्ही कलाकार एक स्वप्न घेऊन प्रयोग करण्यासाठी इथे येतो. रसिक प्रेक्षका आमच्या विश्वासावर नाट्यगृहात येतात. आम्ही रंगकर्मी एक दर्जेदार कलाकृती दाखवायला नाट्यगृहात येतो आणि ती जबाबदरीने दाखवतो सुद्धा. पण कलामंदिर व्यवस्थापनाच्या अशा कारभारामुळे आमच्या मेहनतीवर पाणी फिरते. ह्या संदर्भात संबंधितांनी दखल घ्यावी.'' - वैभव जैस्वाल, सौंदर्य निर्मिती थिएटर, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.