Nashik News : चांदोरी (ता. निफाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पायरीवर महिलेची प्रसूती झाल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांना चौकशी करून अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांना सादर केला आहे. (As health center is on first floor report suggested an elevator option here nashik news)
अहवालात वस्तुस्थिती सांगण्यात आली असून पायरीवरच बाळाचे डोके बाहेर आल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, सदर आरोग्य केंद्र पहिल्या मजल्यावर असल्याने येथे लिफ्टचा पर्याय अहवालात सुचविला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहते यांच्याकडून हा अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना सादर केला जाणार आहे. त्यावर, मित्तल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला प्रसुतीसाठी आली असता तिला आरोग्य केंद्राच्या पहिल्या मजल्यावर प्रसुतीसाठी नेण्यास काही मिनिटे लागली. रूग्णालयाचा आंतररुग्ण विभाग पहिल्या मजल्यावर असल्याने उपस्थित डॉक्टर जखमी रुग्णांवर उपचार करीत होते. संबंधित महिलेच्या आप्तस्वकीयांचा आवाज ऐकून डॉ. गायकवाड व १०८ चे डॉक्टर हे खाली आले. त्यांनी परिचारिकेला प्रसूती किट आणण्यास सांगितले.
मात्र, वेदना अधिक असल्याने बाळाचे डोके बाहेर आल्याने डॉ. गायकवाड व सोबतच्या डॉक्टरांनी स्वत: स्ट्रेचरवर महिलेस पहिल्या मजल्यावर नेले व सुखरूप प्रसूती प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, प्रसिद्ध वृत्तासंदर्भात डॉ. नेहते यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून अहवाल मागविला असता त्यांनी वेळात प्रसूती केल्याचा दावा केला. या प्रकरणाची ओरड झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहते यांनी मंगळवारी तातडीने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बागूल यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी पाठविले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
डॉ. बागूल यांनी उशिराने आरोग्य केंद्रात जाऊन चौकशी केली. यात डॉ. बागूल यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत वस्तुस्थिती जाणून घेतली. यात रुग्णवाहिकेतून सदर माहिला दाखल झाली नसल्याचे निष्पन्न झाले. वेळेत डॉक्टर दाखल झाल्याचे चौकशीत दिसून आले.
या प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसुतीकक्ष वरच्या मजल्यावर का? याची चौकशी करताना संबंधित गावात नदीच्या पाण्याचा पुर मोठ्या प्रमाणात येतो. यामुळे अनेक वेळा पाणी त्यात शिरल्याने सर्व रेकॉर्ड्स, साहित्य यांचे नुकसान होत असते. त्यामुळे येथील कक्ष वरच्या मजल्यावर आहे, असे निदर्शनास आले. यातून मार्ग काढण्यासाठी लिफ्ट यंत्रणा बसविण्यात यावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आल्याचे समजते.
राज्य महिला आयोगाकडून दखल
चांदोरी येथील प्रकरणाची राज्याच्या महिला आयोगाकडून देखील गंभीर दखल घेण्यात आली आहे. याबाबत आयोगाकडून विचारणा झाली असून अहवाल मागविला असल्याची चर्चा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.