येसगाव (जि. नाशिक) : या वर्षातील लग्न सराईला (Wedding Ceremonies) सरतीचे वेध लागले आहेत. ग्रामीण भागात शेतकरी शेतीकामांकडे वळल्याने जूनमध्ये फारसे लग्न नसतात. ४ मेपासून ते २७ मेपर्यंत ११ ते १२ विवाह मुहूर्त आहेत. शेवटच्या दोन तारखांना जादा विवाह आहेत. १८ जूनपर्यंत ७ सर्व मुहूर्त पंचांगनुसार (Panchang) आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या उत्तरार्थापासूनच आकाशात ढग गर्दी करू लागले आहेत. (as wedding season closing soon farmers turned to pre monsoon works Nashik News)
मान्सून (Monsoon) वेळेवर येण्याचे चिन्ह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बळीराजा खरीप हंगामाच्या (Kharif Season) नियोजनात गुंतला आहे. जूनमध्ये विवाह कार्यासाठी वेळ मिळत नाही. पावसाळा सुरू होत असल्यामुळे लग्न समारंभाचे प्रमाण अल्प असते. मे महिन्याच्या सुरवातीपासूनच उन्हाची तीव्रताला न जुमानता वर-वधूकडील वऱ्हाडी, नातेवाईक, मित्रांनी मोठ्या प्रमाणात लग्नांना हजेरी लावली. लग्न समारंभामुळे आर्थिक बजेटवरही परिणाम झाला. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे झाले. विड्याच्या पानापासून ते सोन्याच्या आभूषणापर्यंत विवाह कार्यात लागणाऱ्या वस्तूंमुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली.
कोरोनाचा काळ संपल्यानंतर कोणतीही मर्यादा नसल्याने, डीजेचा दणदणाट, विवाह सोहळ्याला वऱ्हाडींची गर्दी, मिरवणुकीची रंगत, शीतपेयाची विक्री, प्रवाशांनी बसस्थानके फुल्ल, बसस्थानकापासून गावात यायला रिक्षांची चलती, लक्झरी गाड्या, खासगी वाहने, घोडे, मंडप, दागिने, ब्यूटीपार्लस, कपडे, आचारी, किराणा, भाजीपाला, फुले आदी विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’ आले. अनेकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला. इतर व्यावसायिकांप्रमाणे गुरुजी (पुरोहित) लग्नतिथीसाठी व्यस्त होते. ग्रामीण भागातील लग्न शहरी भागात असेल, तर गुरुजींना वऱ्हाडीसोबत घेऊन जावे लागले. त्यांच्याकडे एक-दोन लग्न एकाच दिवशी असल्याने लग्न लवकर आटोपण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
असा गेला हंगाम
जूनमध्ये पावसामुळे लग्न कमी होणार आहेत. वेळ व पैशांच्या बचतीसाठी एका दिवसात अनेक विवाह असल्याने कुटुंबातील सदस्य एकाच दिवशी वेगवेगळ्या विवाहांना हजेरी लावली. विवाहांमुळे बाजारात कोट्यावधींची उलाढाल झाली. वाहतूक व्यवसाय बहरला, पिण्याच्या पाण्यासाठी जार व बाटल्यांना मोठी मागणी झाली. मंगल कार्यालय, लॉन्स न मिळाल्याने मोठ्या पटांगणात विवाह पार पडले. मोठ्यासह चिमुरड्यांनी विवाह सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.