Ashadhi Ekadashi, a grand Dindi ceremony was held at Boys Town School, with the students participating in chanting vithunama with tala-mridung. esakal
नाशिक

Ashadhi 2023: बालवारकऱ्यांच्‍या रिंगण सोहळ्याने फिटले पारणे! टाळमृदुंगच्‍या गजरात विद्यार्थ्यांनी म्‍हटले भजन

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र भक्‍तीमय वातावरण निर्माण झालेले असताना, बॉईज टाऊन शाळेत सोमवारी (ता. २६) अनोखा सोहळा पार पडला.

वारकऱ्यांच्या वेशभूषेत हजेरी लावत विद्यार्थ्यांनी टाळमृदुंगच्‍या गजरात भजन म्‍हणले. तर बालवारकऱ्यांनी साकारलेल्‍या रिंगण सोहळ्याने डोळ्याचे पारणे फिटले होते. (Ashadhi ekadashi 2023 Childrens ringan to fitted with celebrations Bhajans sung by students nashik news)

दिंडी सोहळ्यात सहभागी होत टाळ-मृदुंग घेऊन विठूनामाचा गजर करत असलेले विद्यार्थी.

बॉईज टाऊन शाळेच्या शिक्षकांनी वारकरी नियमावलीप्रमाणे नजर खिळवून ठेवणारा नयनरम्य दिंडी सोहळा आयोजित केला होता. या वेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात जल्‍लोष करण्यात आला. सोहळ्यात पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन हरिनामाचा आनंद लुटला.

सोहळ्याची सुरवात ईश्वर काळे व विद्यार्थ्यांनी जय जय रामकृष्णहरी व रूप पाहता लोचनी भजनाने झाली. हातात भगवा ध्वज घेऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम गजर करत बाल वारकऱ्यांनी रिंगण करून रामकृष्णहरी व विठोबा रखुमाईच्या गजरात पावली खेळले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डोक्यावर तुळसी वृंदावन, हातात भगवे ध्वज, वारकरी खेळ, फुगडी तसेच मानाचे अश्व रिंगण हरीनाम गजरात पार पाडले. बॉईज टाऊन शाळेत पंढरपूर अवतरल्याची अनुभूती येत होती. सोहळा यशस्वितेसाठी ईश्वर काळे व शिक्षक वृंदाने परीश्रम घेतले.

माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ यांनी उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता श्री अनंता मधुसूदना व पसायदान या प्रार्थनेने झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : विकासकामे न करणाऱ्यांकडूनच टीका : शंभूराज देसाई; सुपने येथे प्रचार सभा, टीका न करता कामे करत राहण्याचा निर्वाळा

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

The Sabarmati Report : 12th Fail फेम विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'ची जादू पडली फिकी ; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

SCROLL FOR NEXT