Nashik News : संत सज्जन सगळे नाचती गाती, मेळा भरवती सारखे चालती । कुणी छेडूनी विणा-टाळ हाती धरी, पायी चालतोया पंढरीची वारी।।’ असा मुखी गजर करत त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरसाठी निघालेल्या संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीच बुधवारी (दि. ७) शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले."
आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे मंगळवारी सिन्नर तालुक्यात आगमन झाले. (Ashadhi Vari palanquin of Sant Shresth Nivruttinath Maharaj arrived at Sinnar taluka on Tuesday Nashik News)
पालखीच्या अवघड चढण पार केल्यावर वारकरी पालखीसोबत असणाऱ्या बारा ते पंधरा हजार वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची सोय लोणारवाडी येथे करण्यात आलेली होती. लोणारवाडी येथे मुक्काम केल्यानंतर पालखी सिन्नर शहरात बुधवारी सकाळी नऊ वाजता दाखल झाली.
सिन्नर घोटी महामार्गावरील मारुती मंदिर समोर संत निवृत्तीनाथ महाराज रथाचे पूजन करण्यात आले यावेळी सिन्नर शहरातील नागरिकांनी रथाचे स्वागत उत्साह पूर्वक करून दिंडीत जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नामाचा नाम घोष केला.
यावेळी लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेतर्फे पंढरपूर येथील वारकऱ्यांसाठी अध्यायुक्त अशी रुग्णवाहिका ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे ह भ प डॉक्टर रामकृष्ण लहवितकर महाराज ,माजी आमदार राजाभाऊ वाजे ,युवा नेते उदय सांगळे, त्रंबकेश्वर संस्थांचे अध्यक्ष निलेश गाढवे, माजी गटनेते हेमंत वाजे, सभापती रवींद्र पवार, माजी नगरसेवक, प्रमोद चोथवे, पंकज मोरे, लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेतील अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मारुती मंदिर येथे विनायका ग्रुपचे वरंदळ परिवाराने श्री विठ्ठलाची मूर्ती व्यासपीठावर ठेवून एक वेळेस आकर्षण पायी दिंडी करांना अनुभवास मिळाले यावेळी प्रत्येक वारकऱ्यांनी व्यासपीठावर येत श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.माजी जिल्हा परिषद सदस्य कोकाटे, माजी नगराध्यक्ष रामभाऊ लोणारे, आदींनी उपस्थिती दर्शवली.
संपूर्ण पालखी मार्गावर सुरेख अशी रांगोळी रस्त्यांवर सिन्नर शहरात काढलेली होती. संत निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या स्वागतासाठी फुलांचे तोरण दिले होते.
डोक्यावर तुळशी वृंदावन घेत तसेच खांद्यावर विना व गळ्यात टाळ घेत महिला व पुरुष वारकरी जय हरी विठ्ठल चला पंढरीला असे अभंग म्हणत वारीमध्ये पायी चालत होते. हातात पर्यावरण पूरक जल है तो कल है, झाडे लावा झाडे जगवा, पाणी जपून वापरा असे घोषवाक्य हातात घेत वारकऱ्यांनी सहभाग घेतला. लहान मुलापासून तर ज्येष्ठांपर्यंत वारीमध्ये अनेकांनी भाग घेतलेला दिसला.
सिन्नर शहरात अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले चतुर्थी असल्याने केळी व लाडू तसेच खिचडीचे वाटप अनेक नागरिकांनी केले यावेळी काल भैरवनाथ मित्र मंडळ यांनी खिचडीचे वाटप केले.
तर अनेक ठिकाणी उसाचा रस तसेच पाणी बॉटल वाटप करण्यात आले सिन्नरच्या नागरिकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केलेली होती.
यावेळी सिन्नर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी पालखी मार्गक्रमण करीत असताना वाहनांना दुसऱ्या साईडने सोडले यावेळी सिन्नर शिर्डी महामार्गावर अनेक ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.
तसेच सिन्नर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रितेश बैरागी तहसीलदार बंगाळे, नायब तहसीलदार सागर मुंदडा, सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, मुसळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक,श्याम निकम यांनी पालखी सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.